Join us

ज्युनिअर एनटीआरने सुरू केलं 'वॉर २'चं शूटिंग; हृतिकला तगडी टक्कर देणार अभिनेता! सेटवरील फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 11:19 AM

अभिनेता हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर यांचा बहुप्रतिक्षित 'वॉर-२' चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

War-2 Movie : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि जुनियर एनटीआर (Junior NTR) यांचा बहुप्रतिक्षित 'वॉर -२' (War-2) चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

'वॉर' चित्रपटाच्या यशानंतर 'यश राज स्पाय युनिव्हर्स' चा 'वॉर- २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडचा हॅंडसम हंक हृतिक रोशन पुन्हा एकदा कबीरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला 'वॉर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. सिनेमाच्या पहिल्या भागात हृतिक रोशनसह टायगर श्रॉफ, वाणी कपूर, अनुप्रिया गोयंका यांसारख्या कलाकारांची फौज पाहायला मिळाली. दरम्यान, 'वॉर-२' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये नवा ट्विस्ट आहे. हृतिकसोबत सिनेमात साऊथ सुपरस्टार जुनिअर एनटीआर देखील झळकणार आहे. अशातच जुनिअर एनटीआरचे 'वॉर-२' च्या मुंबईतील सेटवरील काही फोटो समोर आले आहेत. 

'वॉर २' बाबत आणखी महत्वाचा बदल म्हणजे सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी (Ayan Mukherjee) करणार आहेत. हा चित्रपट २०२५ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. परंतु याचदरम्यान चित्रपटाच्या शूटिंगला जोरदार सुरूवात करण्यात आली आहे. 'देवरा' चित्रपटानंतर ज्युनिअर एनटीआर 'वॉर-२' च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं पाहयला मिळतंय. अशातच चित्रपटाच्या सेटवरून अभिनेत्याचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये जुनिअर एनटीआरचा जबरदस्त लूक पाहायला मिळतोय. 

या फोटोंमध्ये साऊथस्टार जुनिअर एनटीआरने खाकी कलरची पॅंन्ट आणि शर्टमध्ये दिसत आहे. अभिनेत्याचे हे फोटो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जुनिअर एनटीआर चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेक्षकांना काय वेगळं पाहायला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

टॅग्स :हृतिक रोशनज्युनिअर एनटीआरबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया