Join us

'जस्ट लुकिंग लाइक अ वॉव', ८१ वर्षीय अमिताभ बच्चन यांचा स्विमिंग कॉश्च्युममधील फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 11:13 IST

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा 'स्विमिंग ड्रेस'मधील फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे अशा स्टार्सपैकी एक आहेत जे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते सर्व वयोगटातील लोकांना प्रेरणा देताना दिसतात. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीव्यतिरिक्त त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच लक्ष वेधून घेतात. ते अनेकदा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित गोष्टी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी त्यांच्या पोहण्याच्या अनुभवाबद्दल एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांनी ५ जानेवारी रोजी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर समुद्र किनाऱ्यावरचा एक अस्पष्ट फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्यांनी बनियन, मॅचिंग शॉर्ट्स आणि त्यावर स्विमिंग जॅकेट आणि काळा चष्मा घातलेला दिसत आहे. फोटोपेक्षा त्यांच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी लिहिले की, 'एबी: एक्सक्युझ मी सर ..? मार्गदर्शक: हा? एबी: अमेरिका किती दूर आहे? मार्गदर्शक: शांत बसा आणि पोहत रहा!'

चाहत्यांनी केले कौतुकपोस्ट शेअर केल्याच्या काही मिनिटांनंतर, बिग बींच्या या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. एका चाहत्याने लिहिले, 'या वयातही तंदुरुस्त असलेल्या या माणसाला सलाम', दुसर्‍याने लिहिले, 'सर तुम्ही अप्रतिम आहात' आणि तिसऱ्या चाहत्याने लिहिले, 'जस्ट लुकिंग लाइक अ वॉव'. आणखी एकाने मोदीजी वर्सेस अमिताभ बच्चन असे कमेंटमध्ये लिहिले.

अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपटअमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडेच त्यांनी 'कौन बनेगा करोडपती' या गेम शोच्या सीझनला अलविदा केला. याशिवाय टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननसोबत ते शेवटचे 'गणपथ'मध्ये दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. या शिवाय, ते प्रभास, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांच्यासोबत 'कल्की 2898 एडी' मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चन