कॉन्सर्टमध्ये अशी होणार जस्टिन बीबरची एंट्री; स्टेडियममध्ये फॅन्सनी केली गर्दी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2017 12:13 PM
इंटरनॅशनल पॉप स्टार जस्टिन बीबर आणि त्याच्या २५ डान्सर्सची टीम रात्री आठ वाजता स्टेजवर येऊन ९० मिनिटांचा परफॉर्मन्स करणार ...
इंटरनॅशनल पॉप स्टार जस्टिन बीबर आणि त्याच्या २५ डान्सर्सची टीम रात्री आठ वाजता स्टेजवर येऊन ९० मिनिटांचा परफॉर्मन्स करणार आहेत. ही संपूर्ण टीम ‘पर्पज’ नावाच्या अल्बममधील गाण्यांवर जबरदस्त परफॉर्मन्स करणार आहेत. याव्यतिरिक्त जस्टिन बेबी आणि बॉयफ्रेण्डमधील काही हिट गाणीही सादर करणार आहे; मात्र उत्सुकतेचा क्षण तेव्हा असेल जेव्हा जस्टिन हातात गिटार घेऊन स्टेजच्या मधोमध वेलवेटच्या काउचवर बसून, ‘कोल्ड वॉटर आणि लव्ह योरसेल्फ’ या गाण्यांवर परफॉर्मन्स करेल. यावेळी त्याची संपूर्ण टीम डीजेच्या तालावर थिरकणार आहे. मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर २३ वर्षीय ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक जस्टिन लाइव्ह कॉन्सर्टमध्ये आपला जलवा दाखविणार आहे. जस्टिनची एक झलक बघण्यासाठी त्याचे फॅन्स सकाळपासूनच स्टेडियममध्ये गर्दी करून आहेत. त्याच्या शेड्यूल्डविषयी बोलायचे झाल्यास जस्टिन ८ वाजता स्टेजवर परफॉर्मन्स करण्यासाठी येणार आहे. हा शो दहा वाजेपर्यंत चालणार आहे; मात्र त्याच्या फॅन्सनी आतापासून मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने जस्टिनला बघण्यासाठी उत्साह तुमच्या लक्षात येऊ शकतो. स्टेडियममध्ये उपस्थित असलेले फॅन्स खूप उत्साहित दिसत असून, काहींच्या हातात जस्टिनचा फोटो असलेले होर्डिंग बघावयास मिळत आहेत. तर काही फॅन्सने शोचे तिकीट दाखवित आहेत. या शोसाठी भारतभरातून जस्टिनचे फॅन्स मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या स्टेडियमच्या चहूबाजूने पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. काहींना तर या कारणामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पार्किंगची सुविधा तिकिटाच्या कॅटेगरीनुसार देण्यात आली आहे. ज्यामध्ये चार हजाराच्या तिकिटाला पहिल्या कॅटेगरीत ठेवण्यात आले आहे, कारण या रकमेचे तिकीट सर्वात स्वस्त आहे. हे तिकीट घेतलेल्या प्रेक्षकांना पार्किंगसाठी तब्बल चार किलोमीटरवर आपली वाहने पार्क करावी लागत आहेत. याव्यतिरिक्त २५ हजार डायमंड, १५ हजार प्लॅटिनम, १० हजार गोल्ड आणि सात हजार सिल्व्हर तिकिटाच्या पार्किंग स्टेडियमपासून दोन किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आली आहे. बीबरला लाइव्ह बघण्यासाठी ४५ हजारांपेक्षा अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी स्टेडियमची सुरक्षा व्यवस्था वाढविली असून, त्यामध्ये २५ अधिकारी व ५०० कर्मचाºयांचा समावेश आहे.