के. के. मेननचे डिजिटल माध्यमात पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 04:26 PM2018-10-02T16:26:45+5:302018-10-03T06:30:00+5:30
'द ग्रेट इंडियन डिसफंक्शनल फॅमिली' ही वेबसीरिज १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या बॉलिवूडमधील कलाकार डिजिटल माध्यमात एन्ट्री करत असून या कलाकारांच्या यादीत आता आणखीन एका कलाकाराची भर पडणार आहे. 'सरकार', 'द गाझी अटॅक', 'हैदर' या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता के.के.मेनन लवकरच डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. तो एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीच्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजचे नाव आहे 'द ग्रेट इंडियन डिसफंक्शनल फॅमिली'. के.के.मेनन डिजिटल माध्यमात पदार्पण करतो आहे हे समजल्यावर ते खूप खूश झाले आहेत.
'द ग्रेट इंडियन डिसफंक्शनल फॅमिली' या वेबसीरिजचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
'द ग्रेट इंडियन डिसफंक्शनल फॅमिली' या वेबसीरिजमध्ये एका विचित्र कुटुंबाची कथा रेखाटण्यात आली असून यात कौटुंबिक ड्रामा पाहायला मिळणार आहे. के. के. मेनन यात मुख्य भूमिकेत दिसणार असून तो पहिल्यांदाच कौटुंबिक सीरिजमध्ये काम करणार आहे. या वेब सीरिजमध्ये के.के. मेननसोबत बरूण सोबती, सनाया पिठावाला, स्वरूप संपत व ईशा चोप्रा कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यात के.के.मेनन बरूणचा मोठा भाऊ विक्रमच्या भूमिकेत दिसणार आहे. बरूणने समरची भूमिका साकारली आहे. १० ऑक्टोबरला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
के.के. मेननची 'द ग्रेट इंडियन डिसफंक्शनल फॅमिली' ही वेबसीरिज रसिकांना भुरळ पाडेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.