आयपीएलनंतर लगेच क्रिकेटपटू के. एल. राहुल भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी रवाना झाला. सध्या राहुल ऑस्ट्रेलियात आहे आणि एका व्यक्तिच्या आठवणीने बेचैन झालाय. ही व्यक्ति कोण तर अथिया शेट्टी. होय, राहुल अथियाला मिस करतोय. आता हे आम्ही नाही तर स्वत: के. एल. राहुलची पोस्ट सांगतेय.के.एल. राहुलने एक पोस्ट शेअर केलीय. यात राहुल उनो खेळताना दिसतोय. ‘मिस उनो नाईट्स’ असे या पोस्टमध्ये के. एल. राहुलने लिहिलेय. या पोस्टमध्ये त्याने अथिया व अन्य काही मित्रांना टॅग केले आहे.
अथिया शेट्टी आणि राहुलच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. खरे तर अथिया व केएल यांपैकी कुणीही अधिकृतपणे या नात्याची कबुली दिली नाही. पण डेटींगच्या चर्चेला हवा देण्याचे काम मात्र त्यांनी न चुकता केले. दोघांचे एकत्र फोटो, एकत्र बाहेर फिरणे, एक दुस-यांचे फोटो शेअर करणे आणि त्यावर क्यूट कमेंट करणे यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. नुकताच अथियाचा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाला के. एल. राहुलने शेअर केलेली पोस्ट लक्षवेधी ठरली होती. अथियासोबतचा फोटो शेअर करत, ‘मॅड चाइल्ड’ असे राहुलने लिहिले होते.
काही दिवसांपूर्वी अथियाने केएल राहुलच्या वाढदिवशी त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. हॅपी बर्थ डे माय पर्सन, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.
अथिया शेट्टी हिने ‘हिरो’ या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. ‘मोतीचूर चकनाचूर’ हा तिचा तिसरा सिनेमाही सुपरडुपर फ्लॉप झाला. तिसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहे.