Join us

 ‘टेलिफोन बूथ’मध्ये रंगला केएल राहुल -अथियाचा ‘रोमान्स’! सुनील शेट्टीने दिली ही प्रतिक्रिया!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 14:00 IST

तिसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहे.

ठळक मुद्देयावर्षी फेब्रुवारीपासून अथिया व केएल राहुल यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले.

सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी हिने ‘हिरो’या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. ‘मोतीचूर चकनाचूर’ हा तिचा तिसरा सिनेमाही सुपरडुपर फ्लॉप झाला. तिसरा चित्रपटही फ्लॉप ठरल्यानंतर अथियाच्या करिअरची नौका बुडताना दिसतेय. पण दुसरीकडे अथियाच्या लव्ह लाईफची चर्चा जोरात आहे. होय, अथिया क्रिकेटपटू केएल राहुलला डेट करत असल्याची सध्या चर्चा आहे. आता या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. होय, खुद्द के एल राहुलने अथियासोबतचा फोटो शेअर केला आणि दोघांच्या रोमान्सची जोरदार चर्चा सुरु झाली. या फोटोवर अथियाचे डॅड सुनील शेट्टीनेही कमेंट केल्याने तर या चर्चेला आणखीच ऊत आला.

अद्याप अथिया किंवा राहुल यापैकी कोणीच त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोललेले नाही पण हे नाते त्यांनी याला नाकारलेही नाही. काही दिवसांपूर्वी एका पार्टीनंतरचे या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता मात्र खुद्द राहुलनेच अथियासोबतचा एक फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केल्याने हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाल्या आहेत. 

के एल राहुलने शेअर केलेल्या फोटात, त्याच्या कानाला फोनचा रिसिव्हर लागलेला आहे. तर त्याचा बाजूला उभी असलेली अथिया हसताना दिसतेय. ‘हॅलो, देवीप्रसाद...?’, असे कॅप्शन राहुलने हा फोटो शेअर करताना दिले आहे. ‘हॅलो, देवीप्रसाद...?’ हे वाक्य सुनील शेट्टीच्या ‘हेराफेरी’ चित्रपटातील आहे, हे तुम्ही जाणताच. सुनील शेट्टीची या फोटोवर आणि त्याच्या कॅप्शनवर नजर गेली आणि त्याने गोड कमेंट दिली.  त्याने  यावर लाफिंग इमोजी पोस्ट केले.  

यावर्षी फेब्रुवारीपासून अथिया व केएल राहुल यांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले. दोघेही अनेकदा बाहेर फिरायला जातात. एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. कॉमन फ्रेन्ड आकांक्षा रंजन हिने सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केल्यानंतर या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदा चर्चा झाली होती. या फोटोत अथिया व केएल राहुल एकत्र दिसले होते.

टॅग्स :लोकेश राहुलअथिया शेट्टी सुनील शेट्टी