Kaabil Making: अंध बनून हृतिक रोशनने कसे केले ‘काबील’मधील स्टंट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2017 5:33 AM
हृतिक रोशन जेव्हा चित्रपट स्वीकारतो तेव्हा त्याची संपूर्ण ऊर्जा त्यामध्ये तो टाकतो. ‘काबील’सुद्धा त्याला अपवाद नाही. हृतिक आणि यामी ...
हृतिक रोशन जेव्हा चित्रपट स्वीकारतो तेव्हा त्याची संपूर्ण ऊर्जा त्यामध्ये तो टाकतो. ‘काबील’सुद्धा त्याला अपवाद नाही. हृतिक आणि यामी गौतम स्टारर या चित्रपटात दोघे अंध प्रेमीयुगुलाच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे अंध असूनही हृतिक ‘काबील’मध्ये जोरदार अॅक्शन करताना दिसतोय.ट्रेलरमध्ये त्याला सफाईदार अॅक्शन स्टंट करताना पाहुन तुम्हाला प्रश्न पडला असेल की, दिसत नसेल तर त्याने हे कसे केले? त्याचे उत्तर तुम्हाला ‘काबील’मधील अॅक्शनची मेकिंग पाहुन मिळेल. निर्मात्यांनी चित्रपटातील अॅक्शन सीन्स कसे चित्रित करण्यात आले, त्यासाठी काय तयारी करावी लागली याचा मेकिंग व्हिडियो शेअर केला आहे.या व्हिडियोमध्ये आपल्याला हृतिकचे भूमिकेप्रति समर्पण दिसते. शूटींगच्या प्रत्येक छोट्यामोठ्या बाबतीत तो सहभागी झालेला आहे. सीन काय आहे याबाबत सूचना देणे, कॅमेऱ्याची जागा व अँगल कसा असेल हे सांगणे अशाप्रकारे तो सर्वच कामे करताना दिसतो. आतापर्यंत त्याने अनेक चित्रपटात काम केले असले तरी या सिनेमातील अॅक्शन सीन शूट करणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. मेकिंग आॅफ काबील: स्टंट करण्यात मग्न हृतिक रोशनतो सांगतो, ‘काबील’मधील अॅक्शन सीन शूट करताना सर्वात अवघड गोष्ट कोणती जर असेल तरी ती म्हणजे मला समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर लागू द्यायची नव्हती. कोण कु ठून ठोसा मारणार, कुठे खड्डा आहे हे मला माहित नव्हते. मला स्वत:ला ‘रोहन’ म्हणजे माझ्या भूमिकेत पूर्णपणे समरस व्हावे लागले. तो कसा विचार करेल, त्यानुसार मी विचार करायचो.’इतके सफाईदार स्टंट करण्यासाठी सर्व कलाकारांनाही तेवढीच मेहनत घ्यावी लागली. स्टंट दिग्दर्शक शाम कौशल यांनी संपूर्ण अॅक्शन सिक्वेन्स तयार केले आहेत. अशा प्रकारची अॅक्शन आपण अद्याप मोठ्या पडद्यावर पाहिलेली नसल्यामुळे येत्या २५ जानेवारीला जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हा तो नक्कीच वेगळा अनुभव असेल.ALSO READ: ‘काबिल’चा पहिला शो ‘रईस’ सोबतच