Join us

वयाच्या चाळीशीत अभिनेत्री झाली बोल्ड; कॅमेरासमोर लिपलॉक करतानाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 10:44 IST

Shefali jariwala : अंकिता लोखंडेच्या होळी पार्टीत झाली लीपलॉक करणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा

मंगळवारी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. यात बॉलिवूडची होळी पार्टी ही कायमच चर्चेत असते. यावेळीदेखील अनेक कलाकारांच्या घरी होळी पार्टीचं आयोजन केलं होतं. यात अनेक लोकप्रिय कलाकारांनी हजेरीही लावली होती. परंतु, यात 'काटा लगा'फेम शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) ही चाहत्यांमध्ये विशेष चर्चिली गेली. वयाच्या चाळीसाव्या वर्षी शेफाली कॅमेरासमोर बोल्ड झाली असून तिने नवऱ्यासोबत लिपलॉक करताना फोटोसाठी पोझ दिली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर शेफाली चांगलीच चर्चेत आली आहे. होळी निमित्त तिने पती पराग त्यागी (Parag Tyagi) याच्यासोबत होळी पार्टीला हजेरी लावली होती. ही पार्टी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांनी आयोजित केली होती. यावेळी पार्टीत सहभागी झाल्यानंतर तिने नवऱ्यासोबत लिपलॉक केलं. ज्यामुळे उपस्थित असलेले सगळेच चक्रावून गेले. इतकंच नाही तर या पार्टीमध्ये मी बोल्ड लूक करुन आली होती. त्यामुळेही अनेकांच्या नजरा तिच्याकडे वेधल्या होत्या.

शेफाली लोकप्रिय अभिनेत्री असून ९० च्या दशकात तिच्या 'कांटा लगा' या गाण्याने तुफान धुमाकूळ घातला होता. शेफालीने काही मालिकांसह रिअॅलिटी शोमध्येही काम केलं आहे. बिग बॉस (Bigg Boss) आणि नच बलिए (Nach Baliye) या शोमध्ये सहभागी झाली होती.

टॅग्स :शेफाली जरीवालाअंकिता लोखंडेसेलिब्रिटीटेलिव्हिजन