Join us

'कभी खुशी कभी गम'मध्ये हृतिकचं बालपण साकारणाऱ्या 'लड्डू'चं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 15:03 IST

'कभी खुशी कभी गम' हृतिक रोशनच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आता दिसतो असा. फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

'कभी खुशी कभी गम' सिनेमा लोकांच्या हृदयाच्या जवळ असणारा सिनेमा. 'कभी खुशी कभी गम' सिनेमा २००१ साली रिलीज झाला. आज सिनेमा रिलीज होऊन २४ वर्ष उलटली तरीही सिनेमा लोकांच्या फेव्हरेट लिस्टमधील एक आहे. 'कभी खुशी कभी गम'मध्ये सर्वच कॅरेक्टर चांगलेच गाजले. यापैकी हृतिक रोशनच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं. 'कभी खुशी कभी गम'मध्ये लड्डूची भूमिका साकारणारा हा अभिनेता आता मोठा झाला असून त्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन बघून तुम्हीही थक्क व्हाल. 

'कभी खुशी कभी गम'मधील लड्डू आता दिसतो असा

'कभी खुशी कभी गम'मध्ये शाहरुख खान आणि लड्डू या दोन भावांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. लड्डू अर्थात हृतिक रोशनच्या बालपणीची भूमिका साकारली अभिनेता कविश मजुमदारने. कविश आता मोठा झाला असून तो आजही मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. कविश विविध जाहिरातींमध्ये काम करतो. कविश आजही हृतिक रोशनच्या संपर्कात आहे. याशिवाय वरुण धवन आणि इतर कलाकार त्याचे चांगले मित्र आहेत.

कविश सध्या काय करतो?

कविशने २०१४ ला आलेल्या 'मै तेरा हिरो' सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात त्याला वरुण धवन, नर्गिस फाखरी आणि इलियाना डीक्रूझसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली. सध्या इमरान खान - करीना कपूर यांच्या 'गोरी तेरे प्यार में' सिनेमात कविशने असिस्टंड डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. लहानपणीच शाहरुख खान, अमिताभ बच्चन, जया बच्चन अशा दिग्गजांसोबत काम करणारा कविश मोठा झाल्यावरही मनोरंजन विश्वात सक्रीय आहे.

टॅग्स :शाहरुख खानअमिताभ बच्चनहृतिक रोशन