'कभी खुशी कभी गम' (kabhi khushi kabhi gham) सिनेमाची आजही सर्वांमध्ये क्रेझ आहे. एक सुंदर कौटुंबिक सिनेमा म्हणून आजही 'कभी खुशी कभी गम' ओळखला जातो. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, काजोल, जया बच्चन, राणी मुखर्जी या कलाकारांची सिनेमात प्रमुख भूमिका होती. 'कभी खुशी कभी गम' तब्बल साडेतीन तासांचा आहे. पण या सिनेमातील अनेक सीन फायनल कटला डिलिट करण्यात आले. कोणते होते हे सीन्स? जाणून घ्या.
'कभी खुशी कभी गम'मधील डिलिटेड सीन्स
'कभी खुशी कभी गम' सिनेमातील शाहरुख आणि काजोलची केमिस्ट्री सर्वांना आवडली. सिनेमातील डिलिटेड सीनमध्ये 'यू आर माय सोनिया' गाण्यावर हतिक-करीना डान्स करताना दिसतात तर दुसरीकडे शाहरुख-काजोलचा डान्स सुद्धा पाहायला मिळतोय. हा सीन खूप मजेशीर असून शाहरुख-काजोल आणि हृतिक-करीना यांची खास केमिस्ट्री बघायला मिळते.
याशिवाय एका डिलिटेड सीनमध्ये अंजलीच्या वडिलांच्या निधनानंतर राहुल अचानक तिच्याशी लग्न करतो. तर दुसरीकडे नैनाच्या घरी तिच्या अन् राहुलच्या साखरपुड्याची तयारी सुरु असते. याशिवाय यशवर्धन (अमिताभ बच्चन) राहुलच्या साखरपुड्याची तयारी करताना दिसतात. परंतु हा सीन कट करण्यात आला आहे. याशिवाय हृतिक-करीनाच्या पहिल्या भेटीचा एक सीन डिलिट करण्यात आलाय. जेव्हा हृतिक पहिल्यांदा करीनाला भेटतो. त्याचवेळी राहुल-अंजली लंडनमध्ये स्थायिक झाल्याचा एक सीन पाहायला मिळतो. हा सीनही 'कभी खुशी कभी गम' काढून टाकण्यात आला. हे सर्व सीन्स तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळतील.