Join us

'कभी खुशी कभी गम'मधला चिमुकला आठवतोय? ऑनस्क्रीन आई काजोलला भेटला अन्...Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 09:10 IST

तो चिमुकला आता ३१ वर्षांचा आहे. दिसतो चार्मिंग अँड हँडसम!

'कभी खुशी कभी गम' (Kabhi Khushi Kabhie Gham)  या करण जोहरच्या गाजलेल्या सिनेमात कलाकारांची फौज होती. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, काजोल, करीना हे मुख्य भूमिकेत होते. सिनेमाची कथा, गाणी सगळंच खूप छान होतं. त्यामुळे सिनेमा आजही लोक आवडीने पाहतात. दरम्यान सिनेमातील शाहरुख-काजोलच्या मुलाची भूमिका साकारणारा तो चिमुकला आठवतोय का? आता तो मोठा झाला असून नुकतीच त्याची आणि काजोलची भेटही झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचा पदार्पण सिनेमा 'आजाद' आज रिलीज झाला. काल सिनेमाचं प्रीमियर पार पडलं. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 'कभी खुशी कभी गम' मधला शाहरुख-काजोलचा मुलगाही या प्रीमियरला हजर होता. त्याचं नाव जिबरान खान (Jibraan Khan). जिबराना रेड कार्पेटवर पापाराझींना पोज देत होता. तेवढ्यात त्याने काजोलला कारजवळ पाहिले. तो धावत तिच्याकडे गेला. दोघांनी गळाभेट घेतली. ऑनस्क्रीन आई आणि मुलगा एकत्र आल्याचा हा क्षण खूपच खास होता. काजोलही त्याला पाहून खूप खूश झाली. तिने त्याची विचारपूस केली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

जिबराना खान आता ३१ वर्षांचा आहे. त्याने बालपणी 'कभी खुशी कभी गम' शिवाय 'रिश्ते','बडे दिलवाला','क्योकी मै झूठ नही बोलता' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. तर गेल्या वर्षीच तो 'इश्क विश्क रिबाऊंड' मध्ये झळकला. जिबरान लहानपणी जितका क्युट दिसायचा आता तेवढाच चार्मिंग दिसतो. सोशल मीडियावर तो सक्रिय असून त्याचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. 

टॅग्स :काजोलसेलिब्रिटीसिनेमाशाहरुख खानसोशल मीडिया