70 वर्षांच्या या अभिनेत्याने चक्क केले होते 41 वर्षांच्या मॉडेलसोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 04:47 PM2020-01-15T16:47:12+5:302020-01-15T16:47:49+5:30

या अभिनेत्याची मुलगी त्याच्या आताच्या पत्नीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे.

kabir bedi and parveen kabir bedi love story | 70 वर्षांच्या या अभिनेत्याने चक्क केले होते 41 वर्षांच्या मॉडेलसोबत लग्न

70 वर्षांच्या या अभिनेत्याने चक्क केले होते 41 वर्षांच्या मॉडेलसोबत लग्न

googlenewsNext
ठळक मुद्देपरवीन कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे. परवीन आणि कबीर यांची पहिली ओळख लंडनमध्ये झाली होती.

'खून भरी मांग' या सिनेमामधील खलनायक किंवा 'मैं हूँ ना' मधील जनरल बक्षी म्हणून आपण कबीर बेदी यांना ओळखतो. त्यांनी अभिनेते, प्रेझेंटर आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कबीर बेदी नेहमीच त्यांच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. कबीर बेदी यांनी त्यांच्या आयुष्यात चार लग्नं केली. त्यांची चौथी पत्नी परवीन दुसांज ही त्यांच्यापेक्षा चक्क 29 वर्षांनी लहान आहे.

कबीर बेदी यांनी त्यांच्या 70 व्या वाढदिवसाला परवीन यांच्यासोबत लग्न केले. त्यांनी दोघांनी 10 वर्षांच्या अफेअरनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परवीन मॉडेल आणि अभिनेत्री असण्यासोबतच एक टिव्ही प्रोड्युसर देखील आहे. ते दोघे लग्नाच्या कित्येक वर्षं आधी लीव्ह इन मध्ये राहात होते. 

तुम्हाला वाचून आश्चर्याचा धक्का बसेल पण परवीन कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा चार वर्षांनी लहान आहे. परवीन आणि कबीर यांची पहिली ओळख लंडनमध्ये झाली होती. सुरुवातीला परवीनच्या घरातील लोकांचा या नात्याला विरोध होता. पण काही वर्षांनंतर तिच्या घरातील देखील यासाठी तयार झाले. त्या दोघांनी केवळ मोजक्या मित्रमंडळींच्या आणि नातलगांच्या उपस्थितीत गुरुद्वारामध्ये लग्न केले होते. 

केवळ परवीनच्या कुटुंबातीलच नव्हे तर कबीर बेदी यांची मुलगी पूजाला देखील हे लग्न पटले नव्हते. कबीर आणि परवीन यांच्या लग्नानंतर एक ट्वीट करत तिने परवीनला चक्क डायन म्हटले होते. 

Web Title: kabir bedi and parveen kabir bedi love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.