बॉलिवूडच्या हँडसम हिरोंमध्ये एक नाव कायम घेतले जाईल, ते म्हणजे कबीर बेदी. अर्थात कबीर बेदी (Kabir Bedi) त्याच्या सिनेमांपेक्षा त्याच्या लग्न आणि रिलेशनशिप्समुळेच अधिक चर्चेत राहिला. आता तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे, त्याचे स्टोरीज आई मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द एक्टर (Stories I Must Tell: An Actor's Emotional Journey) हे आत्मचरित्र. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये कबीर बेदीने हे आत्मचरित्र लिहिले. येत्या 19 एप्रिलला या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. यात त्याने आत्मचरित्रात कबीर बेदीने खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. (kabir bedi reveals about his open marriage of protima and relationship with parveen babi)
प्रोतिमासोबतचे ओपन मॅरेज...कबीर बेदी लिहितो, ‘मी ओपन मॅरेजमध्ये होतो. लोक मला नशीबवान समजत होते. पण या ओपन मॅरेजमुळे माझे प्रोतिमासोबतचे नाते संपुष्टात आले. आधी ओपन मॅरेजची कल्पना आवडली होती. पण नंतर मला यामुळे घुसमटायला होऊ लागले. आमच्या नात्यातील जवळीक बिल्कुल संपली होती. जे प्रेम मला हवे होते, ते कुठे नाहीसे झाले होते. मी एकटा पडलो आणि एकाकीपण मला छळू लागले. हा एकटेपणा परवीन बाबीने (Parveen Babi) दूर केला...’
परवीन बाबीसोबतचे नाते...कबीर बेदी एकेकाळी परवीन बाबीसोबत नात्यात होता. यावरही त्याने लिहिले. त्याने लिहिले, परवीनला केवळ डॅनी डेंजोग्पाची गर्लफ्रेन्ड म्हणूनच मी ओळखत होतो. डॅनी हँडसम होता. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आणि परवीनपेक्षा एका वर्षाने मोठा होता. परवीन व डॅनी खुल्लमखुल्ला एकत्र राहू लागले होते. परवीनला लोक भलेही मॉडर्न मानत. पण मी पारंपरिक विचारांची महिला होती. जुहूची गँग ओशोच्या विचारांनी भारावून ‘फ्री सेक्स’बद्दल बोलत असताना परवीन मात्र या संबंधातही प्रामाणिकपणा असावा, या मताची होती. त्यावेळी मला हेच हवे होते. तिच्या याच विचारांवर मी भाळलो होतो आणि तिच्या प्रेमात पडलो होतो. एकदिवस प्रोतिमा घरी आली मी तिला थेट आज रात्री मी परवीनकडे जाणार असल्याचे सांगितले. आजची रात्रच नाही तर प्रत्येक रात्र मी तिच्यासोबत राहू इच्छितो, असे मी तिला स्पष्टपणे सांगितले. हे ऐकून प्रोतिमा रडू लागली आणि मी तिथून निघून गेलो आणि प्रोतिमासोबतचे माझे ओपन मॅरेज संपुष्टात आले...
ती मला सोडून गेली...पहिल्यांदा स्टारडस्टमध्ये परवीन बाबीच्या मानसिक आजाराबद्दल छापून आले. तिच्या आजारासाठी मला जबाबदार ठरवले गेले. मी तिला सोडले म्हणून ती डिप्रेशनमध्ये गेली, असे काय काय चर्चा सुरु झाल्यात.पण प्रत्यक्षात मी नाही तर परवीन मला सोडून गेली होती. मी तिची मदत करण्यास तयार होतो पण तिने त्यासाठीही नकार दिला होता, असेही कबीर बेदीने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.