बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायकांपैकी एक म्हणजे कबीर बेदी (Kabir Bedi). ते नेहमीच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. कबीर बेदी यांनी चार लग्न केली. त्यांची चौथी बायको तर त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षाही लहान आहे. पण तुम्हाला कबीर बेदी यांचा मुलगा माहितीये का? तो आज बॉलिवूड नाही तर हॉलिवूड इंडस्ट्री गाजवतोय. कोण आहे तो?
बॉलिवूडमध्ये नेपोटिझमची चर्चा सुरु असतानाच कबीर बेदी यांचा मुलगा मात्र हॉलिवूडमध्ये नाव कमावतोय. त्याचं नाव आहे एडम बेदी (Adam Bedi). स्वत: कबीर बेदींनी काही हॉलिवूड सिनेमांमध्ये साईड रोल्स केले आहेत. आता त्यांचा मुलगाही अभिनयात आला आहे. फॅशन डिझायनर सुजैन हम्प्रेज ही कबीर बेदी यांची दुसरी पत्नी. ती मूळ ब्रिटिश आहे. एडम बेदी अमेरिकेत जन्माला आला आणि तिथेच लहानाचा मोठा झाला. तो तिथेच कुटुंबासोबत राहतो. एडम दिसायला अगदी हँडसम आहे. पूजा बेदीचा तो सावत्र भाऊ आहे. एडमने बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध झालं.
एडम बेदीने 'विवा लॉफलिन','जॅकपॉट','लाइफलाइन' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तो 'अ ऑल अबाऊट हर' या बॉलिवूड सिनेमातही दिसला. मात्र हिंदीत त्याला फारसं यश आलं नाही. तसंच वडील आणि सावत्र बहिणीप्रमाणे त्याला प्रसिद्धी मिळाली नाही.