शेंगदाणे विकणारा भुवन बड्याकरचं (Bhuban Badyakar ) ‘कच्चा बादाम’ ( Kacha Badam ) हे गाणं किती लोकप्रिय झालं, हे नव्यानं सांगायची गरज नाही. गाणं इतकं तुफान व्हायरल झालं की भुवन एका रात्रीत स्टार झाला. अगदी भुवनही स्वत:ला सेलिब्रिटी समजू लागला. आता मी सेलिब्रिटी झालोय. आता मी शेंगदाणे विकणार नाही, असं तो म्हणाला. त्याचा हा तोरा पाहून अनेकांनी त्याला ट्रोलही केलं. यादरम्यान भुवनचा अपघात झाला आणि या अपघातानंतर तो पुन्हा एकदा जमिनीवर आला. आता त्याने त्याच्या वक्तव्यासाठी माफी मागितली आहे.
अलीकडे एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या भुवनचे शब्द बदललेले दिसते. ‘मी तसं बोलायला नको होतं. मला आता त्याची जाणीव झाली आहे. मी आता सेलिब्रिटी झालोय, शेंगदाणे विकणार नाही, असं मी म्हणालो होतो. पण तो अहंकार नव्हता. लोकांनीच मला सेलिब्रिटी बनवलं. पण गरज पडली तर मी पुन्हा शेंगदाणे विकेल. मी एक सामान्य माणूस आहे आणि आत्तापर्यंत जगत होतो, तसाच जगणार. हे स्टारडम, ग्लॅमर व मीडिया फार काही माझ्या भोवती फिरणारा नाही. मी सर्वांना सांगू इच्छितो की एक व्यक्ति म्हणून माझ्यात कोणताही बदल झालेला नाही,’असं भुवन म्हणाला.काही दिवसांपूर्वीच भुवनच्या कारला अपघता झाला होता. कार चालवणं शिकत असताना त्याची कार भिंतीवर आदळली होती. यात त्याला दुखापत झाली होती, पण आता तो बरा आहे.
‘कच्चा बादाम’या गाण्यामुळे भुवनचं पार आयुष्यच बदलून गेलं. एका लहानशा खेड्यात शेंगदाणे विकणारा हा व्यक्ती आता चक्क एका म्युझिक अल्बममध्ये थिरकताना दिसत आहे. त्याच्या गाण्याचा रिमेक वर्जन तयार करण्यात आला आहे आणि यामध्ये भुवन हिरोच्या भूमिकेत दिसत आहे. तो सुंदर सुंदर मॉडेल्ससोबत डान्स करताना दिसत आहे.