Kacha Badam Viral Song Singer Bhuban Badyakar : शेंगदाणे विकणारा भुवन बड्याकरचं (Bhuban Badyakar ) ‘कच्चा बादाम’ (Kacha Badam) हे गाणं किती लोकप्रिय झालं, हे नव्यानं सांगायची गरज नाही. गाणं इतकं तुफान व्हायरल झालं की भुवन एका रात्रीत स्टार झाला. अगदी भुवनही स्वत:ला सेलिब्रिटी समजू लागला. आता मी सेलिब्रिटी झालोय. आता मी शेंगदाणे विकणार नाही, असं तो म्हणाला. भुवनच्या डोक्यात हवा गेलेली पाहून अनेकांनी त्याला ट्रोलही केलं. यादरम्यान भुवनचा अपघात झाला आणि या अपघातानंतर तो पुन्हा एकदा जमिनीवर आला. होय, अचानक मिळालेल्या प्रसिद्धीनं माझं डोकं फिरलं होतं. पण आता मला सगळं कळून चुकलं आहे, असं तो म्हणाला. आता काय तर ‘कच्चा बादाम’ गाण्यामुळे रातोरात स्टार झालेल्या भुवनची अवस्था वाईट आहे. कमाई बंद झाली आहे. ज्या गाण्यानं नेम फेम मिळवून दिलं तेच गाणं तो गाऊ शकत नाहीये. भुवनने रडत रडत आपबीती सांगितली.
काय आहे प्रकरणबांगला आज तकला दिलेल्या मुलाखतीत भुवनने आपली व्यथा मांडली. यादरम्यान त्याला अश्रू अनावर झालेत. कॉपी राईटमुळे मी त्रासलो आहे. कच्चा बादाम हे माझं गाणं आहे. पण मी ते गायलं, या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला की मला कॉपीराईट पाठवून रोखलं जातं. यामुळे मला शो मिळत नाहीये. कमाई बंद झाली आहे, असं त्याने रडत रडत सांगितलं.
पुढे तो म्हणाला, गोपाल नावाच्या व्यक्तीने मला ३ लाख रुपये देत हे गाणं त्याच्या यूट्यूब चॅनलवर चालवणार असल्याचं सांगितलं होतं. पण त्यानंतर आता मी हे गाणं गायलं किंवा पोस्ट केलं की कॉपीराइट इश्यू येतो. माझ्या गाण्याचे कॉपीराइट त्या व्यक्तीने विकत घेतलं आहे. त्याने पैसे देताना काही कागदपत्रांवर माझ्या सह्या घेतल्या होत्या. मी अशिक्षित आहे. त्याने याचाच फायदा घेत माझी फसवणूक केली. सध्या काम मिळत नाहीये. आता मी शोमध्ये ते गाणंही गाऊ शकत नाही. छोटं-मोठं काम करून कसाबसा जगतोय, असं तो म्हणाला. यावेळी त्याला अश्रू रोखता आले नाहीत.