1983 मध्ये प्रदर्शित झालेला 'कुली' सिनेमात अमिताभ यांचे डायलॉग आजही रसिक विसरलेले नाहीत. अमिताभ यांचे डायलॉग हे खुद्द कादर खान यांनी लिहीले होते. त्यातला 'बचपन से सर पर अल्लाह का हाथ और अल्लाहरख्खा है अपने साथ, बाजू पर 786 का है बिल्ला, 20 नंबर की बीड़ी पीता हूं और नाम है 'इकबाल'।' आजही रसिकांना आपल्या जुन्या आठवणीत रमायला भाग पाडतो.
1978 आलेला 'मुकद्दर का सिकंदर' सिनेमात फकीर बाबाच्या भूमिकेत झळकलेले कादर खान जीवनाविषयीचे सार्थ अमिताभला समजवतानाचा 'सुख तो बेवफा है आता है जाता है, दुख ही अपना साथी है, अपने साथ रहता है। दुख को अपना ले तब तकदीर तेरे कदमों में होगी और तू मुकद्दर का बादशाह होगा।'.
मिस्टर नटवरलाल 1979 मध्ये प्रदर्शित झाला होता. यांत एका दृष्यात अमिताभ देवाशी बातचित करताना दाखवण्यात आले आहे. 'आप हैं किस मर्ज की दवा, घर में बैठे रहते हैं, ये शेर मारना मेरा काम है? कोई मवाली स्मग्लर हो तो मारूं मैं शेर क्यों मारूं, मैं तो खिसक रहा हूं और आपमें चमत्कार नहीं है तो आप भी खिसक लो।'
अंगार (1992) सिनेमातल्या डायलॉगसाठी तर कादर खान यांना सर्वश्रेष्ठ संवाद फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता. तो असा आहे, 'ऐसे तोहफे (बंदूकें) देने वाला दोस्त नहीं होता है, तेरे बाप ने 40 साल मुंबई पर हुकूमत की है इन खिलौनों के बल पर नहीं, अपने दम पर।'
सत्ते पे सत्ता (1982) मध्ये अमिताभ यांचा दारू पिण्याचा सीन यूट्यूबवर आजही सुपरहिट आहे. तो संवाद असा आहे की, 'दारू पीता नहीं है अपुन, क्योंकि मालूम है दारू पीने से लीवर खराब हो जाता है, लीवर।'
अग्निपथ (1990) सिनेमासाठी अमिताभ यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. धमाकेदार डायलॉगमुळे या सिनेमाने रसिकांची पसंती तर मिळवली. याचे सारे श्रेय कादर खान यांना जाते, 'विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, मां का नाम सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उम्र 36 साल 9 महीना 8 दिन और ये सोलहवां घंटा चालू है।' हा डॉयलॉग आजही रसिकांच्या ओठावर सहज रूळतो.
बाप नंबरी बेटा दस नंबरी (1990) में चालाक ठगच्या भूमिकेत झळकणारे कादर खान यांचा सुपरहिट सीन, 'तुम्हें बख्शीश कहां से दूं, मेरी गरीबी का तो ये हाल है कि किसी फकीर की अर्थी को कंधा दूं तो वो उसे अपनी इंसल्ट मान कर अर्थी से कूद जाता है।'
हम (1991) सिनेमात कादर खान यांचा डबल रोल होता. आर्मी कर्नलच्या भूमिकेतला त्यांचा हा डायलॉग, 'कहते हैं किसी आदमी की सीरत अगर जाननी हो तो उसकी सूरत नहीं उसके पैरों की तरफ देखना चाहिए, उसके कपड़ों को नहीं उसके जूतों की तरफ देख लेना चाहिए।'
अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा जुदाई सिनेमा 1997 मध्ये झळकला होता. यांत परेश रावल आणि कादर खान एकमेकांशी संवादफेक जुगबंदी आजही सा-यांच्या लक्षात असेल. त्यातला 'इतनी सी हल्दी, सारे घर में मल दी, बताओ किसकी सरकार बनेगी?'