Join us

काजल अग्रवालच्या बाळाचा पहिला फोटो समोर; अभिनेत्रीने शेअर केली पहिली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 14:37 IST

Kajal aggarwal: काजलने तिच्या लाडक्या लेकाचं नाव नील असं ठेवलं असून पहिल्यांदाच त्याचा फोटो शेअर केला आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय काजोल अग्रवाल (kajal aggarwal) अलिकडेच आई झाली आहे. १९ एप्रिल रोजी तिने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. नील असं तिच्या लाडक्या लेकाचं नाव ठेवण्यात आलं असून त्याची एक झलक पाहण्यासाठी नेटकरी कमालीचे आतुर झाले होते. त्यामुळे चाहत्यांची ही उत्सुकता फार काळ न ताणता काजलने तिच्या बाळाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या  काजलने तिच्या कवेत झोपलेल्या बाळाचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. सोबतच बाळासाठी एक खास पोस्टही लिहिली आहे.

बाळासाठी काजलची खास पोस्ट

"नील माझ्यासाठी प्रचंड  अनमोल आहे. ज्यावेळी मी पहिल्यांदा त्याला कुशीत घेतलं तो क्षण आजही मी विसरु शकत नाही. त्याला पाहताच क्षणी त्याचवेळी मी त्याच्या प्रेमात पडले होते.  येणाऱ्या पुढच्या काळात मी तुला प्रत्येक गोष्ट शिकवायचा प्रयत्न करेन. पण, त्यापूर्वीच तू मला खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत", असं काजलने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, काजलने ३० ऑक्टोबर २०२० मध्ये गौतम किचलूसोबत लग्न केलं. काजल तेलुगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने साऊथ सह काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहेत. यात अजय देवगणच्या सिंघम या चित्रपटातील तिची भूमिका विशेष गाजली होती.

टॅग्स :काजल अग्रवालTollywoodबॉलिवूडसेलिब्रिटी