बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी म्हणजे अजय देवगण आणि काजोल. लग्नाला २१ वर्षे झाली असतानाही त्या दोघांमधील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. ही गोष्ट निराळी आहे की जेव्हा अजय लग्नाची तारीख विसरला होता तेव्हा काजोल त्याच्यावर प्रचंड रागवली होती.
अजय देवगण आणि काजोल यांच्यातील बॉण्डिंग कुणापासून लपलेले नाही. लग्नाच्या २१ वर्षानंतरही या दोघांचे प्रेम तरूणाईला लाजवेल असे आहे. ही गोष्ट वेगळी आहे की जेव्हा अजय देवगण लग्नाची तारीख विसरतो तेव्हा काजोल त्याला खरेखोटे ऐकवण्याची एकही संधी सोडत नाही. आपल्याला असे तेव्हा पहायला मिळाले जेव्हा रॅपिड फायर राउंडमध्ये होस्ट करण जोहरने अजयला त्याच्या लग्नाची तारीख विचारली तेव्हा त्याला त्याचे उत्तर देता आले नाही. त्यानंतर काजोल चांगलीच भडकली होती. मात्र करणने त्यावेळी परिस्थिती बरोबर सांभाळून घेतली.
अजय काजोलसोबत तासन तास बसायचा आणि काजोल तिच्या नात्यातील प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सल्ला द्यायचा. काजोलचे तिच्या प्रियकरासोबत प्रेम जुळवता जुळवता अजय कधी काजोलच्या प्रेमात पडला हे त्यालाही कळले नाही. काजोलचीही वेगळी अवस्था नव्हती.