अजय देवगण (Ajay Devgan) व काजोलची (Kajol) लेक न्यासा देवगण (Nysa Devgan) या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. अद्याप न्यासाचा बॉलिवूड डेब्यू झालेला नाही. पण सेलिब्रिटी किड असल्यामुळे कॅमेरे सतत तिच्यावर असतात. 19 वर्षांची न्यासा सध्या विदेशात शिकतेय आणि सध्या मुंबईत आहे. मग काय चर्चा तर होणार. सध्या चर्चा आहे ती न्यासाच्या पार्टीची. नुकतीच न्यासाने एका रेस्टॉरंटमध्ये पार्टी केली. आर्यन खान, सुहाना खान, शनाया कपूर, अनन्या पांडे आणि अन्य मित्रांसोबत तिने मस्तपैकी पार्टी एन्जॉय केली. पार्टी संपल्यानंतरचा न्यासाचा एक व्हिडीओ समोर आला आणि हा व्हिडीओ पाहून अजय देवगणच्या लेकीला लोकांनी ट्रोल करायला सुरूवात केली.
व्हिडीओत न्यासा शॉर्ट पिंक ड्रेसमध्ये दिसतेय. तिने हाय हिल्स घातल्या आहेत. बातमीसोबतच्या व्हिडीओत ती कारमधून उतरताना व्हिडीओत दिसतेय. याआधी न्यासाचा पार्टीमधून बाहेर पडतानाचा व्हिडीओही समोर आला होता. यात ती रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली होती. रेस्टॉरंटंच्या दरवाज्यावरच ती धडपडते. तिचा तोल जातो. तिचा सुरक्षा रक्षक तिला सावरतो आणि गाडीपर्यंत पोहोचवतो.
रेस्टॉरंटमध्ये धडपडत चालनाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरुन हटवण्यात आला आहे. पण तरी यामुळे न्यासा प्रचंड ट्रोल होतेय. ती दारूच्या नशेत आहे, अशा कमेंट केल्या आहेत. अनेकांनी यानिमित्ताने अजय आणि काजोलवरही ताशेरे ओढले आहेत. अर्थात काही जणांनी तिला बचावही केला आहे. हे तिचं आयुष्य आहे, तिला जगायचं तसं जगू द्या, असं अनेकांनी म्हटलं आहे.
20 एप्रिल 2003 रोजी जन्मलेली काजोल व अजयची लेक न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिकतेय. न्यासाचा बॉलिवूड डेब्यू कधी होणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. मात्र सध्या न्यासा शिकतेय. आत्ता ती तिचं लाईफ एन्जॉय करतेय. ती इतक्या लवकर इंडस्ट्रीत येईल, असं मला वाटत नाही, असं काजोल अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती.