सर्वसामान्य जनताच नाही तर बॉलिवूड स्टार्सही महागाईने हैराण झाले आहेत. अलिकडेच अभिनेत्री काजोल(Actress Kajol)ने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने खुलासा केला आहे की तिच्या घराचे वीज बिल पाहून तिला धक्का बसला आहे. हे विजेचे बिल नसून सूर्यप्रकाश वापरल्याचेही बिल दिले आहे असे दिसते.
अभिनेत्री काजोल तिच्या घरचे वाढलेले विजेचे बिल पाहून हैराण झाली आहे. तिने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'मला माझे वीज बिल मिळाले आहे. मला असे वाटते की हे बिल सूर्यप्रकाशासाठी, दिव्य प्रकाशासाठी आणि बोगद्याच्या शेवटी असलेल्या प्रकाशासाठी आहे.
काजोल तिच्या कुटुंबासोबत राहते शिवशक्ती बंगल्यातकाजोल आणि अजय देवगण त्यांची मुले न्यासा देवगण आणि युग यांच्यासह मुंबईतील जुहू येथे एका आलिशान बंगल्यात राहतात. त्यांच्या घराचे नाव आहे शिवशक्ती. या भव्य आणि आलिशान बंगल्याची किंमत ६० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
वर्कफ्रंटकाजोल शेवटची 'दो पत्ती' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता, ज्यामध्ये अभिनेत्री क्रिती सनॉन आणि शाहीर शेख मुख्य भूमिका साकारताना दिसले होते. पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत काजोलने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले. आता काजोलकडे 'महारागिणी' हा चित्रपट आहे. हा एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट असेल ज्याचे दिग्दर्शन चरण तेज उप्पलपति करत आहेत. या चित्रपटात प्रभूदेवा देखील असणार आहे. याशिवाय ती मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनसोबत 'सरजमीन' या चित्रपटातही दिसणार आहे. कयोज इराणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. विशेष म्हणजे सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान 'सरजमीन'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.