Join us

वडिलांच्या विरोधात जाऊन काजोलने केलं होतं अजय देवगणसोबत लग्न, जाणून घ्या त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 6:00 AM

काजोलचे वडील त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते. पण आई तनुजाचा या लग्नाला पूर्ण पाठिंबा होता.

काजोल आणि अजय देवगण इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जोडी चाहत्यांना आवडते. आज काजोल आज तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करते आहे. काजोलच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिची आणि काजोलची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी सांगणार आहोत.  

काजोल आणि अजय देवगणच्या लग्नाला २३ वर्षेहून अधिक वर्षे झाली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का अभिनेत्रीचे वडील या लग्नाच्या विरोधात होते. एका मुलाखती दरम्यान काजोलने स्वत: हा खुलासा केला होता. 

अशी सुरु झाली होती लव्हस्टोरीअजय देवगण व काजोल यांची पहिली भेट १९९५ साली झाली होती. ‘हलचल’च्या सेटवर. अर्थात या पहिल्या भेटीत अजयला काजोल त्याला बडबडी व उद्धट वाटली होती. दुस-यांदा तर त्याला तिला भेटायचेदेखील नव्हते. विश्वास बसणार नाही यानंतर पुढचे दोन वर्षे खरोखर दोघेही एकमेकांना भेटले नाहीत. कारण त्यावेळी अजय दुस-या कोणाला तरी डेट करत होता आणि काजोलदेखील दुसऱ्या मुलासोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण काही वर्षांनंतर ते भेटले आणि मग त्यांच्यात मैत्री झाली.

वयाच्या 24 व्या वर्षी लग्न करण्याची इच्छा नव्हतीकाजोल आणि अजय देवगणचे वैवाहिक आयुष्य सुरळीत चालले आहे. नीसा आणि युग अशी दोन मुलं आहेत आणि ते दोघेही पालकांची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळत आहेत. लग्नानंतरही काजोल आज चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. काजोल एका न्यूज पोर्टलशी बोलताना तिच्या लग्नाबद्दल एक खुलासा केला होता. ती म्हणाली होती, तिचे वडील शोमू मुखर्जी वयाच्या २४ व्या वर्षी लग्न करण्याच्या निर्णयाच्या विरोधात होते. लग्नाआधी काजोलने काम करावे अशी त्याची इच्छा होती. मात्र, काजोलच्या या निर्णयाला तिची आई तनुजा यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला.

काजोलची आई तनुजाने तिला पाठिंबा दिला काजोलने सांगितले की, तिच्या आई तनुजा सांगितले आपण आपल्या मनाचे ऐकले पाहिजे. अजय देवगण आणि काजोलचे २४ फेब्रुवारी १९९९ रोजी लग्न झाले.

 

टॅग्स :काजोलअजय देवगणबॉलिवूड