Join us

Nysa Devgn : न्यासा आईचं पण ऐकेना...! काजोलच्या लेकीचं वागणं पाहून संतापले नेटकरी, केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 11:42 AM

Kajol, daughter Nysa Devgn at NMACC Video : न्यासा व तिच्या आईचा म्हणजेच काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ समोर येताच, काजोलची लेक पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

Kajol, daughter Nysa Devgn Video  : अजय देवगणकाजोलची लेक न्यासा देवगण आता मोठी झालीये. पण न्यासा सोशल मीडियावर सतत ट्रोल होताना दिसते. कधी रंगरूपामुळे, कधी बोल्ड कपड्यांमुळे, कधी बॉलिवूड पार्ट्यांमुळे न्यासा सतत ट्रोलर्यच्या निशाण्यावर येते. सध्याही तेच. तिचा व तिच्या आईचा म्हणजेच काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ समोर येताच, काजोलची लेक पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्च इव्हेंटच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. काजोल आणि तिची लेक न्यासा दोघी यावेळी एकत्र दिसल्या. याच कार्यक्रमातील दोघी मायलेकींचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचं कारण ठरला आहे. 

काजोल व न्यासा दोघीही यावेळी क्रिम कलरच्या डीपनेक ड्रेसमध्ये दिसल्या. दोघीही कमालीच्या सुंदर दिसत होत्या. याचदरम्यान दोघी मायलेकी पापाराझींना पोझ देत असताना असं काही घडलं की, ते पाहून अनेकांनी न्यासाला ट्रोल करायला सुरूवात केली. सुरुवातीला न्यासाने आईसोबत काही पोझ दिल्या. फोटोग्राफर्सनी न्यासाला सोलो पिक्चर देण्याची विनंती केली. काजोलने न्यासाला फोटो देण्यास सांगताच न्यासा बिथरली. काजोलने तिला हात धरून रोखण्याचा प्रयत्न केला. पण न्यासा आईचा हात झटकून तिथून निघून गेली. लेकींचं मीडियासमोरचं हे वागणं काजोलला खटकलं. पण तिने शांतपणे परिस्थिती हाताळली. पण न्यासाचं वागणं सोशल मीडिया युजर्सनी आवडलं नाही. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या."आजच्या पिढीला पालकांसोबत फोटो काढण्यात इंटरेस्ट नसतो", असं एकाने लिहिलं.  "ही आजकालची ही मुलं सर्वांसमोर पालकांचा अपमान करतात,"असं एकाने लिहिलं. "न्यासाला बहुतेक पार्टीत जाण्याची घाई झालीये," अशा शब्दांत काहींनी तिला ट्रोल केलं.

अजय व काजोलची १९ वर्षांनी लेक न्यासा सध्या शिकतेय. न्यासाचा बॉलिवूडमध्ये येण्याचा काहीही इरादा नसल्याचं अजय व काजोलने वेळोवेळी सांगितलं आहे. पण न्यासा अनेकदा बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये दिसते. अलीकडे या पार्ट्यांमधील तिचा बोल्ड लुक पाहून सोशल मीडिया युजर्सनी तिला नको एवढं ट्रोल केलं होतं.अलीकडे अजय देवगण न्यासाच्या सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर बोलला होता. विशेषत: न्यासाच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, न्यासाला लोक ट्रोल करतात, हे मला प्रचंड त्रास देतं. मी यामुळे त्रस्त आहे. पण मी हे बदलू शकत नाही. अनेकदा कल्पनाही करवत नाही, असं काही ट्रोलर्स लिहून जातात. अनेकदा असत्य गोष्टी लिहिल्या जातात. पण काय करणार? मी हे बदलू शकत नाही. यावर मी काही बोललो तर परिस्थिती अजूनच बिघडेल, ते आणखी वाढवून चढवून लिहितील, असं तो म्हणाला होता.

टॅग्स :काजोलअजय देवगण