Join us

काजोलने लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वडिलांनी धरला होता अबोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 17:50 IST

काजोल आणि अजय देवगण यांनी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या लग्नाबाबत काजोलचे वडील खूश नव्हते असे तिने या कार्यक्रमात नेहाशी बोलताना सांगितले होते.

ठळक मुद्देमला लग्न करायचे असे मी माझ्या बाबांना ज्यावेळी सांगितले, त्यावेळी ते जवळजवळ आठवडाभर माझ्याशी बोलत नव्हते. तुझे करियर खूपच चांगले आहेस. तसेच तू वयाने खूपच लहान आहेस. त्यामुळे लग्न करण्याची घाई का करत आहेस असे त्यांचे म्हणणे होते.

काजोल आणि अजय देवगण यांचे कपल सगळ्यांनाच आवडते. ते दोघे अनेक समारंभात, फिल्मी पार्टीत एकत्र दिसतात. नो फिल्टर नेहा या चॅट शोमध्ये तिने काही दिवसांपूर्वी हजेरी लावून नेहा धुपियासोबत प्रचंड गप्पा मारल्या होत्या. अजय आणि काजोलच्या लग्नाच्यावेळी काजोलच्या घरातल्यांची काय प्रतिक्रिया होती याविषयी तिने या मुलाखतीत सांगितले होते. 

काजोल आणि अजय देवगण यांनी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या लग्नाबाबत काजोलचे वडील खूश नव्हते असे तिने या कार्यक्रमात नेहाशी बोलताना सांगितले होते. काजोल कधीही तिच्या खाजगी आयुष्याविषयी बोलणे टाळते. पण काजोलने इतक्या लहान वयात लग्न करू नये असे तिच्या घरातल्यांना वाटत होते. तसेच अजयसोबत तिने लग्नच करू नये असे देखील काहींचे म्हणणे होते असे तिने नेहाच्या कार्यक्रमात कबूल केले. याविषयी ती सांगते, अजयच्या कुटुंबियांशिवाय आणि माझ्या कुटुंबियांशिवाय अनेकांना आम्ही लग्न करू नये असेच वाटत होते. 

त्यांच्या लग्नाविषयी पुढे काजोल सांगते, मी लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी माझ्या कुटुंबातील काहीजण देखील द्विधा मनःस्थितीत होते. मला लग्न करायचे असे मी माझ्या बाबांना ज्यावेळी सांगितले, त्यावेळी ते जवळजवळ आठवडाभर माझ्याशी बोलत नव्हते. तुझे करियर खूपच चांगले आहेस. तसेच तू वयाने खूपच लहान आहेस. त्यामुळे लग्न करण्याची घाई का करत आहेस असे त्यांचे म्हणणे होते. पण मला लग्न करायचे या गोष्टीवर मी ठाम होते. माझा आणि अजयचा स्वभाव खूपच वेगवेगळा आहे. त्यामुळे आम्ही कपल म्हणून कसे असू असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. खरे तर अनेकांनी आम्हाला दोघांना एकत्र वेळ घालवताना पाहिले नव्हते. त्यामुळे त्यांना असे वाटत असेल असे माझे ठाम मत होते. 

काजोल आणि अजयचे कपल लोकांना प्रचंड आवडते. त्यांच्या या सुखी संसाराचे रहस्य काय आहे हे देखील तिने या कार्यक्रमात सांगितले आहे. ती सांगते, आम्ही दोघांनी नेहमीच आमच्या नात्याला आणि मुलांना प्राधान्य दिले आहे. आम्ही दोघे आता एक व्यक्ती असून आमची दोन मुलं म्हणजे आमचे दोन हात आहेत असेच आम्ही म्हणतो. 

टॅग्स :काजोलअजय देवगण