Join us

"सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका साकारणं हे माझ्यासाठी...", 'तान्हाजी' सिनेमासाठी काजोलची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 18:43 IST

ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन चार वर्ष पू्र्ण झाली आहेत. या निमित्ताने काजोलने खास पोस्ट शेअर केली आहे.

९०चं दशक गाजवणाऱ्या काजोलने अनेक सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिले. 'दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे', 'कुछ कुछ होता है', 'बाझीगर' या सिनेमातील तिच्या भूमिका गाजल्या. काजोलने 'तान्हाजी' या ऐतिहासिक सिनेमात शूरवीर तान्हाजी मालुसरेंच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरेंची भूमिका साकारली होती. २०२० साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमातील काजोलने साकारलेल्या भूमिकेचंही कौतुक झालं होतं. 

ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी' सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन चार वर्ष पू्र्ण झाली आहेत. या निमित्ताने काजोलने खास पोस्ट शेअर केली आहे. काजोलने तिच्या इन्स्टाग्रामवरुन या सिनेमातील काही फोटो शेअर केले आहेत. "सावित्रीबाई मालुसरेंसारख्या धाडसी व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आपल्या योद्धांच्या शौर्यकथा सांगितल्या गेल्या पाहिजेत. त्यांच्या पराक्रमातून मिळणाऱ्या प्रेरणेची गरज आहे," असं काजोलने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

'तान्हाजी' सिनेमातून सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या शौर्याची गाथा आणि सिंहगडाच्या लढाईचा थरार मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. या सिनेमात अजय देवगणने तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली होती. तर काजोल मालुसरेंच्या पत्नीच्या भूमिकेत होती. शरद केळकरने या सिनेमात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होतं. या सिनेमाला प्रेक्षकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. 

टॅग्स :काजोलअजय देवगणसेलिब्रिटीसिनेमा