Join us

‘त्या’ रात्री कमल सदानाचं अख्खं कुटुंब संपलं...! काजोलच्या ‘हिरो’ची ही स्टोरी वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 8:00 AM

Kamal Sadanah Birthday : ही घटना घडली त्यादिवशी कमल सदानाचा 20 वाढदिवस होता. त्याच्या डोळ्यांदेखत त्याचं अख्खं कुटुंब उद्धवस्त झालं होतं...

Bollywood Actor Kamal Sadanah Birthday : एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी त्याप्रमाणे या अभिनेत्याचं अख्खं कुटुंब एका रात्रीत संपलं. होय, वडिलांनी आई व बहिणीची गोळ्या घालून हत्या केली आणि पाठोपाठ स्वत:वरही गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना घडली त्यादिवशी या अभिनेत्याचा 20 वाढदिवस होता. त्याच्या डोळ्यांदेखत त्याचं अख्खं कुटुंब उद्धवस्त झालं होतं. या अभिनेत्याचं नाव आहे कमल सदाना.

21 ऑक्टोबर 1970 रोजी जन्मलेला कमल सदाना हा अभिनेता अनेकांच्या विस्मृतीत गेला आहे. 1992 साली ‘बेखुदी’  या चित्रपटात कमल सदाना दिसला होता. यात त्याची हिरोईन होती काजोल. होय, काजोलचा हा पहिला चित्रपट होता.  या चित्रपटानंतर काजोलने आपल्या फिल्मी करिअरमध्ये बराच मोठा पल्ला गाळला. पण या चित्रपटातील तिचा हिरो अर्थात कमल सदाना मात्र काळासोबत फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाला. 

कमल सदानाने अभिनय सोडून आता अनेक वर्षे उलटली आहेत. याच कमलच्या खासगी आयुष्यातील एक घटना वाचून तुमच्याही मनाचा थरकाप उडेल. कमलचे वडिल बृज सदाना यांनी कमलच्या डोळ्यांसमोर त्याच्या आई व बहीणीची हत्या केली होती. वडिलांनी कमलवरही गोळी चालवली. पण या हल्ल्यातून कमल थोडक्यात बचावला होता. ही घटना घडली, त्यादिवशी कमलचा 20 वा वाढदिवस होता. 

कमलने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला होता, माझ्या आईवडिलांमध्ये सतत भांडणं व्हायची. त्यादिवशी माझा वाढदिवस होता. माझ्या 20 व्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या वडिलांनी आधी आईवर आणि नंतर माझ्या बहिणीवर गोळ्या झाडल्या. आई बाबाचे भांडण सुरू होताच मी माझ्या रूममध्ये गेलो आणि थोड्याच वेळात मला गोळी झाडल्याचा आवाज आला. मी घाबरून बाहेर आलो तर माझी आई आणि बहीण दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्या दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला होता. बाबांनी माझ्यावरही गोळी झाडली. पण ती माझ्या कानाला चाटून गेली आणि मी थोडक्यात बचावलो.  नंतर माझ्या वडिलांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. हे सगळं माज्या डोळ्यांसमोर घडलं. आई व बहिणीच्या हत्येची दृश्य अनेकवर्षे माझ्या डोळ्यांसमोर येत असतं. मी यानंतर अनेक वर्षे डिप्रेशनमध्ये गेलो होतो. विशेष म्हणजे, वडिलांनी असं का केलं, याचं उत्तर आजही कमलकडे नाही.

कमलचा पहिला सिनेमा फार कमाल दाखवू शकला नाही. मात्र यानंतर रिलीज झालेल्या ‘रंग’ या सिनेमाने त्याला एक नवी ओळख दिली. यानंतर त्याने  बाली उमर को सलाम, रॉक डान्सर, हम सब चोर है, कर्कश, व्हिक्टोरिया नंबर 203 अशा अनेक चित्रपटांत काम केले. पण ‘रंग’ सारखं यश त्याला मिळू शकलं नाही. पुढे कमल छोट्या पडद्याकडे वळला. दिग्दर्शनात आला.  अ‍ॅक्टिंग सोडून मी आनंदी आहे, असं कमल अलीकडे म्हणाला होता.

टॅग्स :काजोलबॉलिवूडसेलिब्रिटी