बॉलिवूड अभिनेत्री काजोलने (Kajol ) काल तिचा 47 वा वाढदिवस (Kajol Birthday) साजरा केला. आपल्या लाडक्या अभिनेत्रीचा वाढदिवस म्हटल्यावर चाहते क्रेझी होणारच. असेच काही क्रेझी चाहते काजोलच्या वाढदिवशी केक घेऊन तिच्या घराबाहेर पोहोचले. पण काजोलचा अॅटिट्यूड पाहून या चाहत्यांचीही निराशा झाली असावी. होय, यादरम्यान व्हिडीओत असे काही कैद झाले की, तो व्हिडीओ पाहून नेटकरीही भडकले. काजोल बॉलिवूडची एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे असंख्य चाहते आहेत. सोशल मीडियावरही तिचे 11.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. हे तेच चाहते आहेत, जे काजोलच्या प्रेमात वेडे आहेत. तिच्या अभिनयाचे ‘दीवाने’ आहेत. पण सध्या अनेक चाहते काजोलची भडकलेले दिसत आहेत. तिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट्स करून आपला संताप व्यक्त करत आहेत.
काही फॅन्स केक घेऊन काजोलच्या घराबाहेर पोहोचले. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला. काजोल केक कापण्यासाठी घराबाहेर आली. काही फॅन्सनी केक तिच्यापुढे केला. पण काजोलने दूरूनच कसाबसा केक कापला आणि काही सेकंद थांबून अगदी आली तशी घरात निघून गेली. काजोलचा हा अॅटिट्यूट लोकांना आवडला नाही.
ज्या लोकांच्या प्रेमामुळे हे लोक मोठे होतात, त्यांनाच अॅटिट्यूड दाखवतात, असे एका युजरने लिहिले. लोक यांना इतका भाव का देतात माहित नाही? भाव देणे बंद करा, आपोआप जमिनीवर येतील,अशी कमेंट एका युजरने केली. काश, इथे डिसलाईकचे बटण असते. हा अॅटिट्यूड जरा जास्तच झाला, अशी संतप्त प्रतिक्रिया अन्य एका युजरने दिली. अॅक्टिंग अशी जणू उपकार करतेय. रिअल लाईफमध्येही किती अॅक्टिंग करतात हे लोक, अशी भावना एका युजरने व्यक्त केली. गर्विष्ठ महिला, ही चाहत्यांच्या प्रेमाच्या लायकीचीच नाही. यांच्यापेक्षा गरिब, अनाथ मुलांचे वाढदिवस साजरे करा, अशा शब्दांत एका युजरने राग व्यक्त केला.