Join us

एकाच छताखाली पोहचले करण जोहर, काजोल आणि अजय देवगण... अन् मग ‘असे’ घडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2017 11:08 AM

दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री काजोल यांच्यातील तुटलेल्या नात्यांबाबत कोणाला माहीत नसेल तरच नवल. गेल्या वर्षीच्या अखेरीस या दोघांमध्ये ...

दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री काजोल यांच्यातील तुटलेल्या नात्यांबाबत कोणाला माहीत नसेल तरच नवल. गेल्या वर्षीच्या अखेरीस या दोघांमध्ये असे काही युद्ध छेडले गेले की, त्यामुळे या दोघांच्या नात्यात दरार निर्माण झाली. २५ वर्षांची मैत्रीचा शेवट अशाप्रकारे होईल याचा कोणी विचारही केला नव्हता. करणने तर या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना असेही म्हटले होते की, आता काजोल माझ्या आयुष्याचा भाग नाही. त्यामुळे पुन्हा हे दोघे आमने-सामने येतील असा कोणी विचारही केला नव्हता. जर आलेच तर काय होईल, याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल. मात्र एका अवॉर्ड सोहळ्यात काजोल, करण आणि अजय देवगण आमने-सामने आले, मग काय घडले असेल? त्याचे झाले असे की काल रात्री काजोल पती अजय देवगण याच्यासोबत एच. टी. मोस्ट स्टायलिस्ट अवॉर्डच्या ठिकाणी पोहोचली होती. त्या ठिकाणी अगोदरच करण जोहर असल्याने या तिघांचा टकराव अटळ समजला जात होता. त्याचबरोबर असे झाल्यास काय घडेल, असा विचारही अनेकांच्या मनात आला होता. मात्र शोच्या व्यवस्थापकांनी अशी काही शक्कल लढविली की, या तिघांना समोरा-समोर येणे अवघड होऊन बसले. व्यवस्थापकांनी वेळेचे असे काही नियोजन केले की, तिघांना एकमेकांचे चेहरेही बघता आले नाही. एका मनोरंजन वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, अवॉर्डच्या व्यवस्थापकांनी या तिघांच्या बसण्याचे स्थान आणि वेळेच्या नियोजनाचा अगोदरच विचार करून ठेवला होता. त्यांच्यातील वाद सर्वश्रृत असल्याने अवॉर्ड सोहळ्यात जर यांचा टकराव झाला तर उगाचच माध्यमांमध्ये याबाबतची चविष्ट चर्चा रंगणार अन् सोहळ्याला गालबोट लागणार या विचाराने व्यवस्थापकांनी यांना समोरासमोर येऊच दिले नाही. सोहळ्याच्या एका बाजूला काजोल आणि अजयला जागा देण्यात आली होती, तर दुसºया बाजूला करण बसलेला होता. शिवाय या दोघांच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यांचीही वेगळी व्यवस्था केली होती. त्यामुळे फोटोग्राफर्सला या दोघांचे एकत्र फोटो काढता आले नाही. एकाच छताखाली असतानाही दोघांना आमने-सामने येता आले नसल्याने व्यवस्थापकांचे कौतुक केले जात आहे, तर असे घडले असते तर नेमके काय झाले असते, या प्रश्नांच्या उत्तरासाठी लोकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे, हेही तेवढेच खरे आहे.