Join us

काजोलने केले मोदी सरकारचे कौतुक; म्हटले, ‘आता लोकांनी जबाबदारी ओळखावी’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 11:02 AM

अस्वच्छतेमुळे लोकांचे जीव जात असून, ते रोखण्यासाठी विद्यमान सरकारचे स्वच्छता अभियान प्रभावी असल्याची स्तुतिसुमने अभिनेत्री काजोलने उधळली आहेत. काजोलने ...

अस्वच्छतेमुळे लोकांचे जीव जात असून, ते रोखण्यासाठी विद्यमान सरकारचे स्वच्छता अभियान प्रभावी असल्याची स्तुतिसुमने अभिनेत्री काजोलने उधळली आहेत. काजोलने आयएएनएस मुंबईला फोनवर सांगितले की, ‘मला असे वाटते की, स्वच्छता आणि साफसफाईचा मुद्दा प्रत्येक देशात आहे. त्यामुळे हा प्रश्न फक्त भारतातच आहे, असे अजिबात नाही. केवळ भारतात हा मुद्दा आता चर्चेचा विषय बनला आहे. कारण आतापर्यंत एकाही सरकारने या मुद्द्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जोर दिला नाही. त्यामुळे जर स्वच्छ भारत म्हणून बदल घडवून आणायचा असेल तर लोकांनीही हे अभियान सार्थकी ठरवायला हवे.’लाइफबॉयच्या ‘हेल्प अ चाइल्ड रिच फाइव्ह’ या अभियानाची समर्थक असलेल्या काजोलने पुढे म्हटले की, ज्या पद्धतीने जगभरात प्रदूषण होत आहे, त्यावरून लोकांनी आपली जबाबदारी ओळखायला हवी. त्याचबरोबर प्रदूषणाला आळा घालण्यासाठी स्वत:हून जबाबदारीने काम करायला हवे. काजोल हात धुवून स्वच्छता ठेवण्याचा संदेश देण्यासाठी संयुक्त राष्टÑ संघाच्या महासभेचा भागही बनली आहे. याविषयी काजोलने म्हटले की, स्वच्छतेचे कार्य माझ्या हृदयाजवळ आहे. कारण लहान मुलांचे आयुष्य वाचविण्यासाठी हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे मी समजते. मी एक आई असून, स्वच्छतेचे महत्त्व जाणून आहे. भारतात दरवर्षी ३० बालमृत्यू याच कारणामुळे होत असल्याचेही काजोलने सांगितले. अभिनेता अजय देवगणची पत्नी असलेली काजोल नायसा आणि युग नावाच्या दोन मुलांची आई आहे. यावेळी काजोलला दोन मुलांचा सांभाळ आणि काम याकडे तू कशा पद्धतीने बघतेस? असे विचारण्यात आले तेव्हा काजोलने म्हटले की, ही खूपच गुंतागुंतीची आणि दररोज घडणारी प्रक्रिया आहे. कारण मला असे वाटते की, तुम्ही या दोन्ही गोष्टींकडे कशा पद्धतीने बघता हे महत्त्वाचे आहे. एखाद्या दिवशी तुम्ही चांगली आई असता, एखाद्या दिवशी तुम्ही चांगली पत्नी असता, तर कधी तुम्ही उत्कृष्ट अभिनेत्री असतात. त्यामुळे या सर्व जबाबदाºयांकडे गांभीर्याने बघून सर्वोत्कृष्ट काम करायला हवे. काजोल प्रदीप सरकार दिग्दर्शित आगामी चित्रपटात एका आईच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे.