Join us

काजोलने पहिल्यांदाच शेअर केला सासूचा फोटो, खूपच सुंदर दिसते अजय देवगणची आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:34 PM

काजोलने सासूच्या वाढदिवसानिमित्ताने नुकताच त्यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देअजय देवगणची आई आजही तितकीच सुंदर दिसते असे लोक कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

काजोल आणि अजय देवगणची जोडी चाहत्यांची आवडती आहे. दोघेही सुखांने संसार करत आहेत. त्यांच्या लग्नाला जवळपास 22 वर्षे झाली आहेत. 

काजोल एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिने लग्न केल्यानंतर चित्रपटांत काम करण्याचे प्रमाण खूपच कमी केले. ती जास्तीत जास्त वेळ तिच्या कुटुंबियांना देते. काजोल आणि अजय देवगण यांना न्यासा आणि युग अशी दोन मुलं आहेत. 

काजोल ही खूप चांगली सून देखील आहे.  काजोलचे तिचे सासरे विरू देगवण यांच्यासोबत खूप चांगले नाते होते. ते अजय आणि काजोलसोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत असत. त्यांचे निधन काही वर्षांपूर्वी झाले. त्यांच्या निधनाने काजोल संपूर्णपणे कोलमडली होती. 

काजोल आणि तिच्या सासूचे देखील अगदी मुलगी आणि आईसारखे नाते आहे. काजोलने सासूच्या वाढदिवसानिमित्ताने नुकताच त्यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अजय देवगणची आई आजही तितकीच सुंदर दिसते असे लोक कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

अजय देवगण व काजोल यांची पहिली भेट १९९५ साली झाली होती. ‘हलचल’च्या सेटवर. अर्थात या पहिल्या भेटीत अजयला काजोल त्याला बडबडी व उद्धट वाटली होती. दुसऱ्यांदा तर त्याला तिला भेटायचेदेखील नव्हते. विश्वास बसणार नाही यानंतर पुढचे दोन वर्षे खरोखर दोघेही एकमेकांना भेटले नाहीत. कारण त्यावेळी अजय दुस-या कोणाला तरी डेट करत होता आणि काजोलदेखील दुसऱ्या मुलासोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण काही वर्षांनंतर ते भेटले आणि मग त्यांच्यात मैत्री झाली. 

अजय काजोलसोबत तासन तास बसायचा आणि काजोलला तिच्या नात्यातील प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सल्ला द्यायचा. काजोलचे तिच्या प्रियकरासोबत प्रेम जुळवता जुळवता अजय कधी काजोलच्या प्रेमात पडला हे त्यालाही कळले नाही. काजोलचीही वेगळी अवस्था नव्हती. काजोल आणि अजय देवगणने २४ फेब्रुवारी, १९९९ ला लग्न केले.

टॅग्स :काजोलअजय देवगण