Join us

प्रनूतनच्या डेब्यूवर आत्या काजोलने दिली 'ही' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:00 IST

सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटातून जहीर इक्बालसोबत प्रनूतन बहल बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे.

ठळक मुद्दे प्रनूतनच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन अभिनेत्री काजोल खूप उत्साही आहे

सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटातून जहीर इक्बालसोबत प्रनूतन बहल बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे.  प्रनूतन अभिनेत्री नूतन यांची नात आणि मोहनीश बहल यांची कन्या आहे. प्रनूतनच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन अभिनेत्री काजोल खूप उत्साही आहे. आता तुमच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल की, प्रनूतनच्या डेब्यू बाबत काजोल का खूश आहे ? तर काजोलची आई तनुजा आणि नूतन दोघी बहीणी आहेत.

 नात्याने काजोल आणि मोहनीश बहल मावस भाऊ-बहीण आहेत. याच नात्याने प्रनूतनची काजोल आत्या आहे. त्यामुळे आपल्या भाचीच्या डेब्यूला घेऊन काजोल खूपच उत्साहित आहे. काजोलला प्रनूनतवर पूर्ण विश्वास आहे. अभिनयचे बाळकडून तिला घरातच मिळाले आहे. त्यामुळे पूर्ण प्रामाणिकपणे ती आपले काम करुन आयुष्यात पुढे जाईल असा विश्वास काजोलने व्यक्त केला आहे.      

नोटबुकच्या ट्रेलरला आणि गाण्यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. प्रनूतन आणि इक्वालची केमिस्ट्रही प्रेक्षकांना भावली आहे. नोटबुक' चित्रपटात २००७ सालातील कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात तलवाच्या मध्यभागी असलेल्या एका शाळेवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. त्यामुळे निर्मात्यांनी या चित्रपटाचा सेट पाण्यात बनवला आहे.  येत्या २९ मार्चला ‘नोटबुक’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

टॅग्स :प्रनूतन बहलकाजोलसलमान खान