Join us

शाहरुख खानला कधीच मेसेज करत काजोल, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 19:48 IST

Kajol And Shah Rukh Khan : काजोलने शाहरुख आणि त्यांच्या मैत्रीबद्दल अनेक गुपिते उघडली. पण ती शाहरुखला कधीही मेसेज करत नाही, असेही काजोलने सांगितले.

जेव्हा जेव्हा काजोल (Kajol) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) एकत्र आले तेव्हा या जोडीने बॉक्स ऑफिसवर धमाल केली. दोघांनी एकत्र असे अनेक चित्रपट केले आहेत ज्यातून भरपूर कमाई केली. या दोघांची केवळ ऑनस्क्रीनच नाही तर पडद्याबाहेरही चांगली केमिस्ट्री आहे. हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, अनेक वर्षांच्या मैत्रीनंतरही काजोलशाहरुख खानला मेसेज करत नाही. या मागचे कारण माहित आहे का?

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत काजोलने शाहरुख आणि तिच्या मैत्रीबद्दल मोकळेपणाने सांगितले. अभिनेत्री म्हणाली की, 'आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. मी त्याला दिवसा किंवा रात्री कधीही कॉल करू शकते. मला माहित आहे की जेव्हाही मला पहाटे ३ वाजता फोन करायचा असतो. तेव्हा तो माझा फोन नक्कीच उचलतो. माझ्या बाजूनेही असेच घडते. काजोल पुढे म्हणाली, 'मी रोज गुड मॉर्निंग मेसेज किंवा फुलांचे फोटो पाठवत नाही. मी असे करण्याचा प्रयत्न केला तर शाहरुख मला काटेरी चमच्याने मारेल. 

एकत्र झळकले या सिनेमात

काजोल आणि शाहरुख अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. ज्यामध्ये 'बाजीगर', 'करण अर्जुन', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'माय नेम इज खान' आणि 'दिलवाले' यांचा समावेश आहे. काजोल अलीकडेच 'द ट्रायल' वेब सीरिजमध्ये दिसली होती, तर 'पठाण' नंतर शाहरुख लवकरच 'जवान'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचे पहिले गाणे 'जिंदा बंदा' नुकतेच रिलीज झाले आहे. बातम्यांनुसार, या गाण्यासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानकाजोल