अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले बालकलाकार (Child Actors) आता मोठे झालेत. त्यांचे लेटेस्ट बघून त्यांना ओळखणं ही कठीण झालायं. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. अशाच एका बालकलाकारबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. काजोल आणि शाहरुख खानच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. यात काजोलची छोटी बहीण छुटकीच्या भूमिका साकरणारी बालकलाकार आठवतेय?, तिने छुटकीच्या भूमिकेत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
चित्रपटात छुटकीची भूमिका पूजा रूपारेलने साकारली होती. चित्रपटात छुटकीचे शाहरुख खानसोबत चांगलं बॉन्डिंग दाखवलं होते. पण आता ती कशी दिसते आणि काय करते याबद्दल कोणतीही माहिती नाही.
पूजा रुपारेल एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती एक स्टँड अप कॉमेडियन आणि गायिका देखील आहे. पूजाचा जन्म 21 नोव्हेंबर 1980 रोजी मुंबईत झाला आणि तिने 1993 मध्ये किंग अंकल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तिच्या पहिल्याच चित्रपटात दमदार अभिनय केला.
पूजा रुपारेलला तिचा सर्वात मोठा ब्रेक शाहरुख आणि काजोलच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटात मिळाला, ज्यात तिने चुटकीची भूमिका केली होती. मोठा चष्मावाली चुटकी सगळ्यांचा आवडली होती.
पूजाने वयाच्या 13 व्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये पाऊल ठेवले आणि तिने अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही काम केले, परंतु त्यानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली आणि आता ती स्टँड-अप कॉमेडियन आहे. पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो ती नेहमी शेअर करत असते.