काजोल (Kajol) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. १९९२ साली 'बेखुदी' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या काजोलनं बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. काजोलची बहिण तनिषा (Tanishaa) मुखर्जी ही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. काजोल आणि तनिषा या दिग्गज स्टार तनुजा आणि दिग्दर्शक, लेखक तसेच निर्माते शोमू मुखर्जी यांच्या मुली आहेत. तनिषाने २००३ रोजी प्रदर्शित झालेल्या 'श्शsss' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. पण, काजोलच्या पहिल्या चित्रपटांइतके तनिषाचे चित्रपट चांगली कामगिरी करू शकले नाहीत. तनिषा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
तनिषा मुखर्जी पारदर्शक असलेला जाळीदार ड्रेस घातल्यानं प्रचंड ट्रोल झाली आहे. तनिषा मुखर्जी चित्रपटांमध्ये कमी दिसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. याशिवाय, ती फॅशन इव्हेंट्समध्येही दिसते. अलिकडेच, ती 'द वर्ड मॅगझिन फॅशन शो'मध्ये सहभागी झाली होती. पण, लोकांना तिचा लूक फारसा आवडला नाही. तिनं काळ्या रंगाच्या नेटचा जाळीदार ड्रेस घातला होता, ज्यावर काही भागांवर पांढऱ्या रंगाची मोठी फुलं होती, ज्यांनी तिच्या शरीराचा काहीच भाग झाकला होता. अनेकांनी काजोलच्या बहिणीची तुलना उर्फी जावेदशी केली आहे.