Join us  

Kakuda Trailer: 'मुंज्या' फेम दिग्दर्शकाचा हॉरर कॉमेडी 'ककुडा', रितेश देशमुख-सोनाक्षी सिन्हा झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 11:24 AM

मंगळवारी दरवाजा खुला ठेवला नाही तर... 'ककुडा' चा ट्रेलर रिलीज

मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा नुकताच रिलीज झालेला 'मुंज्या' सिनेमा सुपरहिट झाला. हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता आदित्यचा आगामी 'ककुडा' (Kakuda) हा हॉरर कॉमेडी सिनेमा रिलीज होतोय. यामध्ये रितेश देशमुख (Riteish Deshmukh), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि साकिब सलेम (Saqib Salem) यांची मुख्य भूमिका आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी आताच सुपरहिट आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

'ककुडा'सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. एक गाव ज्याला दोन दरवाजे असतात. छोटा दरवाजा ककुडा या भूतासाठी असतो जो दर मंगळवारी संध्याकाळी 7.15 वाजता ककुडासाठी खुला ठेवावा लागलो. जर कोणी असं केलं नाही तर १३ व्या दिवशी त्याचा मृत्यू होतो. सिनेमात साकीब सलेम आणि सोनाक्षी सिन्हा हे कपल आहे. तर रितेश देशमुखला भूताला पळवून लावण्यासाठी गावात बोलवले जाते. स्त्री, मुंज्या प्रमाणेच हाही सिनेमा तुफान कॉमेडी आणि हॉरर असणार आहे. 

१२ जुलै रोजी 'ककुडा' झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. सिनेमातील डायलॉग्स ऐकून जोरजोरात हसू फुटेल. सिनेमाची गोष्ट ककुडाच्या शापावर आधारित आहे ज्याची गावात दहशत असते. रितेश, सोनाली आणि साकीब या तिकडीची धमाल सिनेमात पाहायला मिळणार आहे. तसंच 'पंचायत' सीरिजमधला जावई अभिनेता आसिफ खानही या सिनेमात आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेंड झहीर इकबालसोबत तिने रजिस्टर मॅरेज केले. लग्नानंतर रिलीज होणारा तिचा हा पहिलाच सिनेमा आहे. सोनाक्षी सिन्हा सध्या नवऱ्यासोबत हनिमून एन्जॉय करत आहे. 

टॅग्स :रितेश देशमुखसोनाक्षी सिन्हासिनेमासाकिब सलीम