छोट्या पडद्यावर १९ वर्षांपूर्वी एका बालअभिनेत्रीनं रसिकांवर मोहिनी घातली होती. तिचं कधी निरागस कधी खोडकर असणं रसिकांना भावलं होतं. ‘करिश्मा का करिश्मा’ आणि सोनपरी या मालिकेतील तिचा अभिनय रसिकांना भावला. ९०च्या दशकात बालकलाकार म्हणून ती प्रसिद्धीच्या शिखरावर होती. ती बालकलाकार म्हणजे झनक शुक्ला. ‘करिश्मा का करिश्मा’ या मालिकेत झनकने रोबोटची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका बच्चेकंपनीसह तमाम रसिकांना भावली होती. बालपणीच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी झनक अचानक पडद्यापासून दूर गेली. सोनपरी मालिकेनंतर रसिकांना तिचं दर्शन झालं नाही.
मालिकेसह ती रूपेरी पडद्यावरही झळकली होती. 'कल हो ना हो' या सिनेमातील चिमुकली जिया तर प्रेक्षकांना खूप आवडली होती. बालपणीच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी झनक अचानक पडद्यापासून दूर गेली. गेल्या काही वर्षात तिच्यात खूपच बदल झाला आहे. सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असल्याने तिचे आताचे फोटो आवर्जून पाहायला मिळतात. तिची आई सुप्रिया शुक्लादेखील याच क्षेत्रात असून आजपर्यंत अनेक मालिकेत त्यांना आपण पाहिले आहे. तिचे वडील हरी शुक्ला हे फिल्ममेकर आहेत.
भविष्यात झनकला सामाजिक कार्य करायची इच्छा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 2७.4k इतके फॉलोअर्स आहेत. तिला फिरण्याचीही खूप आवड आहे. वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत ती तेथील संस्कृती जाणून घेत तिथले खास गोष्टी कॅम-यात कैद करत असते. अभिनयाच्या क्षेत्रात परतण्याचा झनकचा तूर्तास तरी कोणताही इरादा नाही.
सध्या ती तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत आहे. इनस्टाग्रामवर झनकचे बरेच फोटो असून त्यात तिला ओळखणं कठीण आहे. ती आपला बराच वेळ मित्रमैत्रिणींसह घालवते. भविष्यात झनकला सामाजुक कार्य करायची इच्छा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे बरेच फॉलोअर्स आहेत.