ठळक मुद्देबुधवारी महावीर जयंतीच्या सुट्टीचा फायदा सिनेमाला झाला असेलकलंक संपूर्ण देशात 4000 स्क्रिनवर रिलीज करण्यात आला
करण जोहरचा मल्टीस्टारर 'कलंक' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडियावर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली असल्याचा अंदाज आहे. ट्रेड एक्सपर्टनुसार कलंक पहिल्यादिवशी 21 ते 23 कोटींचा गल्ला केला आहे.
बुधवारी महावीर जयंतीच्या सुट्टीचा फायदा सिनेमाला झाला आहे. तसेच 'कलंक'ला टक्कर देण्यासाठी बॉक्स ऑफिसवर कोणताच मोठा सिनेमा रिलीज झालेला नाहीय या गोष्टीचा फायदा 'कलंक'ला नक्कीच होऊ शकतो.
ट्रेड एनालिस्ट तरण आर्दशच्यानुसार, कलंक संपूर्ण देशात 4000 स्क्रिनवर रिलीज करण्यात आला. जगभरात 5300 स्क्रिनवर 'कलंक' रिलीज करण्यात आला आहे. अभिषेक वर्मनने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. वरुण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने 20 वर्षानंतर माधुरी-संजय दत्त एकत्र आले.
करण जोहरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. करण जोहरचे वडील यश जोहर यांनी १५ वर्षांपूर्वी हा सिनेमा बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. या सिनेमासाठी यश जोहर यांनी बराच रिसर्च केला होता. अगदी पाकिस्तानाही ते गेले होते. कलंकची कथा भारत-पाकिस्तान फाळणी पूर्वीची आहे. लाहोर जवळच्या हुसैनाबाद शहरात लोहार काम करणारे बहुसंख्य मुस्लिम राहत असतं.