दोन दिवसांपूर्वी करण जोहरने आपल्या ‘कलंक’ या मल्टीस्टारर चित्रपटाचा टीजर रिलीज केला होता. हा टीजर रिलीज झाला आणि त्यावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्यात. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या टीजरचे कौतुक केले. ४० च्या दशकाची कथा असलेल्या या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे दमदार कलाकार आहेत. साहजिकचं या चित्रपटाकडून करणला प्रचंड अपेक्षा आहेत. चित्रपटाला भव्यदिव्य बनवण्यात करण कुठलीही कसर सोडू इच्छित नाही. इतकेच नाही तर या चित्रपटाला सुपरहिट बनवण्याची एकही संधी करण सोडू इच्छित नाही. त्याचमुळे रिलीजच्या एक महिन्यापूर्वीच या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे.
करण जोहरचा नवा फंडा; महिनाभरापूर्वीच सुरु केले ‘कलंक’चे अॅडव्हान्स बुकिंग!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 13:39 IST
‘कलंक’ला भव्यदिव्य बनवण्यात करण कुठलीही कसर सोडू इच्छित नाही. इतकेच नाही तर या चित्रपटाला सुपरहिट बनवण्याची एकही संधी करण सोडू इच्छित नाही.
करण जोहरचा नवा फंडा; महिनाभरापूर्वीच सुरु केले ‘कलंक’चे अॅडव्हान्स बुकिंग!!
ठळक मुद्देअभिषेक वर्मन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अभिषेकने यापूर्वी अर्जुन कपूर व आलिया भट्ट स्टारर ‘2 स्टेट्स’ दिग्दर्शित केला होता.