कालच करण जोहरचा आगामी मल्टीस्टारर चित्रपट ‘कलंक’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज व्हायला उणेपुरे १३-१४ दिवस उरले असताना हा ट्रेलर रिलीज केला गेला. ‘कलंक’च्या ट्रेलरमधून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे पे्रमाचा त्रिकोण. होय, या चित्रपटात आलिया-वरूण आणि आदित्य राय कपूर व सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘लव्ह ट्रँगल’ दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये सगळेच स्टार्स दिसले. पण यातही माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांनी केवळ झलक तेवढी दिसली. मग काय? माधुरी व संजयच्या चाहत्यांनी लगेच याबद्दल नाराजी बोलून दाखवली.
‘कलंक’चा ट्रेलर पाहून बिथरले माधुरी दीक्षित व संजय दत्तचे फॅन्स! हे आहे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 10:50 IST
कालच करण जोहरचा आगामी मल्टीस्टारर चित्रपट ‘कलंक’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आणि माधुरी दीक्षित व संजय दत्तचे फॅन्स बिथरले.
‘कलंक’चा ट्रेलर पाहून बिथरले माधुरी दीक्षित व संजय दत्तचे फॅन्स! हे आहे कारण!!
ठळक मुद्दे४० च्या दशकाची कथा असलेल्या या चित्रपटात वरूण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर असे दमदार कलाकार आहेत.