Join us  

प्रदर्शनाआधीच 'कल्कि 2898 एडी' सिनेमाची तिकीट विक्री सुसाट, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 3:07 PM

२७ जूनला 'कल्कि 2898 एडी' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण, प्रदर्शनाआधीच या सिनेमाने अ‍ॅडव्हान्स बुकिगंमधून कोटींची कमाई केली आहे. 

'कल्कि 2898 एडी' या बिग बजेट बॉलिवूड सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. येत्या २७ जूनला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण, प्रदर्शनाआधीच या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिगंमधून कोटींची कमाई केली आहे. 

'कल्कि 2898 एडी' सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. पहिल्या ३६ तासांतच सिनेमाच्या लाखो तिकिटांची विक्री झाली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, आत्तापर्यंत सिनेमाची ५ लाख ६२ हजार ९४५ तिकिटे विकली गेली आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमधून सिनेमाने तब्बल १७.४३ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 'कल्कि 2898 एडी' सिनेमा प्रदर्शनाच्या दिवशीच बंपर कमाई करण्याचा अंदाज आहे. 

नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्कि 2898 एडी' हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. एका महाकाव्यावर हा सिनेमा आधारित आहे.  ६०० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमात दीपिका, अमिताभ बच्चन, प्रभास यांच्याबरोबर कमल हसन, दिशा पटानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

'कल्कि 2898 एडी' सिनेमा देशात तब्बल ४५०० ते ५००० स्क्रीन्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. IMAX आणि 3D फॉर्मेटमध्येही हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. हिंदीबरोबरच तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्येही हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. 

टॅग्स :दीपिका पादुकोणप्रभासअमिताभ बच्चनसिनेमा