Join us  

'कल्की'चा तो क्लायमॅक्स सीन, प्रेग्नंट दीपिकाला केसांना धरुन ओढलं; रणवीर सिंहने सेटवर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 12:40 PM

अभिनेते शाश्वत चॅटर्जी म्हणाले, "सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये मला दीपिकाला केसांना धरुन ओढायचं होतं. तेव्हा ती प्रेग्नंट होती..."

नाग अश्विन यांच्या 'कल्की 2898 AD' (Kalki 2898 AD) चा सध्या बॉक्सऑफिसवर बोलबोला आहे. पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या सिनेमात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन, कमल हसन, प्रभास, दीपिका पदुकोण, मृणाल ठाकूर असे एकापेक्षा एक कलाकार आहेत. सिनेमाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये अभिनेता शाश्वत चॅटर्जीने (Saswata Chatterjee) दीपिका पदुकोणसोबतचा (Deepika Padukone) एक किस्सा सांगितला. 

न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत शाश्वत चॅटर्जी म्हणाले, "सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये मला दीपिकाला केसांना धरुन ओढायचं होतं. तेव्हा ती प्रेग्नंट होती. तसंच सेटवर रणवीर सिंह सुद्धा हजर होता. तेव्हा मी रणवीरकडे गेलो आणि त्याला हा विश्वास दिला की काळजी करु नको अशा सीन्सवेळी दीपिकाबाबतीत पूर्ण सावधानता बाळगली जात आहे. जिथे गरज आहे तिथे बॉडी डबलचा आधार घेतला जात आहे. हे ऐकून रणवीर हळूच हसत म्हणाला, 'मला माहितीये दादा.'

'कल्की'मधला हा क्लायमॅक्स सीन मुंबईतच शूट झाला होता. दीपिकाने सिनेमात सुमति ही भूमिका साकारली आहे. तिला पकडण्यासाठी शाश्वत चॅटर्जी शंबालाच्या गुप्त भूमीत आलेले दिसतात. तेव्हा हा सीन शूट करण्यात आला आहे. दीपिकाबद्दल ते म्हणाले, "ती नेहमी हसतमुख असते. तिच्यासोबत शूटिंग करताना खूप मजा आली."

'कल्की 2898 AD' ने बॉक्सऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडले. देशात सिनेमाने आतापर्यंत 414 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 700 कोटींचा बिझनेस केला आहे. लवकरच सिनेमा 1000 कोटींच्या क्लबमध्ये जाईल असा अंदाज आहे.

टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूडसिनेमागर्भवती महिला