Join us

वाढदिवशी 'प्रोजेक्ट के'मधील अमिताभ बच्चन यांचा लक्षवेधी लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 18:29 IST

वाढदिवशी चाहत्यांना 'प्रोजेक्ट के' मधील अमिताभ यांचा नवा लूक बघायला मिळाला आहे. 

 बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज ८१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसाचे औचित्य साधत देशातील नव्हे तर जगभरातील चाहत्यांनी लाडक्या बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवशी चाहत्यांना 'प्रोजेक्ट के' मधील अमिताभ यांचा नवा लूक बघायला मिळाला आहे. 

आज  'प्रोजेक्ट के' च्या टिमने ट्विट करत अमिताभ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय, त्यांनी सिनेमातील अमिताभ यांचा हटके लूक असलेलं पोस्टरदेखील रीलिज केलं आहे.  चित्रपटाच्या पोस्टरमध्ये बिग बी पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसत आहेत. 

 बहुचर्चित 'प्रोजेक्ट के'  सिनेमा तेलुगु, हिंदी भाषांमध्ये चित्रीत केला आहे. हा सिनेमा 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाग अश्विनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रभास, दीपिका आणि कमल अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले होते. त्यानंतर काही दिवस त्यांनी शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. 

अमिताभ बच्चन आगामी 'गणपत' या चित्रपटात दिसणार आहेत, ज्यात टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट विकास बहलने दिग्दर्शित केला असून 20 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय, अमिताभ हे रजनीकांत यांचा आगामी सिनेमा 'थलाइवर 170' मध्येही पाहायला मिळणार आहेत.  

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटी