'कल्कि २८९८ एडी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलंच गाजलं. 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाने सर्वांचं प्रेम मिळवलं. आधुनिक काळात घडणाऱ्या कथानकाचं महाभारताशी कनेक्शन जोडल्याने हा सिनेमा सर्वांना पसंत पडला. हा सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली. पण अनेकांना हा सिनेमा थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 'कल्कि २८९८ एडी' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे.
'कल्कि २८९८ एडी' या ओटीटीवर होणार रिलीज
नाग अश्विन दिग्दर्शिक 'कल्कि २८९८ एडी' हा सिनेमा आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. 'कल्कि २८९८ एडी' हा सिनेमा २३ ऑगस्टला प्राईम व्हिडीओ या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज व्हायची शक्यता आहे. याविषयी अधिकृत घोषणा झाली नसली तरीही 'कल्कि २८९८ एडी' प्राईम व्हिडीओवर तेलुगू, तामिळ भाषेत रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे 'कल्कि २८९८ एडी' ची हिंदी आवृत्ती नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
'कल्कि २८९८ एडी' सिनेमाविषयी
नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्कि 2898 एडी' हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे. महाभारत या महाकाव्यावर हा सिनेमा आधारित आहे. ६०० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमात दीपिका, अमिताभ बच्चन, प्रभास यांच्याबरोबर कमल हासन, दिशा पटानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'कल्कि २८९८98 एडी' सिनेमा देशात तब्बल ४५०० ते ५००० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. IMAX आणि 3D फॉर्मेटमध्येही हा सिनेमा प्रदर्शित केला गेला आहे. हिंदीबरोबरच तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्येही हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.