Join us

आई बनल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती ही अभिनेत्री, तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 5:45 PM

प्रेग्नंसीदरम्यान नैराश्याने देखील ग्रासल्याचे तिने म्हटले आहे. रात्रं रात्रं झोप यायची नाही.अशा कित्येक रात्र जागं राहून काढल्याचे तिने म्हटले आहे.रात्रीची झोप न येणं हे अतिशय त्रासदायक असल्याचेही तिने म्हटले आहे.

आई होणं ही एक अतिशन सुंदर भावना आणि अनुभव आहे असे असले तरी शारिरिकदृष्ट्या आणि मानसिकदष्ट्या याचा परिणाम होत असतो. काल्की कोल्चिनने मुलीला जन्म दिल्यानंतर सध्या ती मदरहुड एन्जॉय करत आहे. नुकतेच कल्किने एका गोष्टीचा खुलासा केला आहे. आई बनल्यानंतर तिला नैराश्याचा सामना करावा लागल्याचे तिने म्हटले आहे.

 

गरोदरपणात अनेक शारिरिक बदल होत असतात. आपण फक्ते गरोदरणातल्या सुंदर अनुभवांविषयी बोलतो.त्याचदरम्यान येणा-या कटू अनुभवांबद्दल बोलणे मात्र टाळत असल्याचे तिने म्हटले आहे. नक्कीच गरदोर असल्यापासून ते बाळाला जन्म देईपर्यत प्रत्येक आईसाठी हा सुखद अनुभव असतोच. यावर जितके मनमोकळेपणाणे आपण बोलतो तितकेतच इतर गोष्टींवरही बोलणे गरजेचे असल्याचे तिने म्हटले आहे. 

 

प्रेग्नंसीदरम्यान उल्ट्या होण, अचानक अशक्तपणा वाटणे या सगळ्या गोष्टींमुळे स्वतःच्या शरीराची चीड येऊ लागली होती. यादरम्यान कोणताच विचार करु शकत नव्हते. या सगळ्यांगोष्टीचा प्रेग्नंसीदरम्यान खूप त्रासही सहन करावा लागला. प्रेग्नंसीदरम्यान नैराश्याने देखील ग्रासल्याचे तिने म्हटले आहे. रात्रं रात्रं झोप यायची नाही. अशा कित्येक रात्र जागं राहून काढल्याचे तिने म्हटले आहे.रात्रीची झोप न येणं हे अतिशय त्रासदायक असल्याचेही तिने म्हटले आहे.

17 तासांच्या प्रसूती कळा अन् साफोचा जन्म...! कल्की कोच्लिनने मानले डॉक्टरांचे आभार

17 तासांच्या प्रसूती वेदना सहन करताना मला धीर देणा-या माझ्या डॉक्टरांचेही आभार, असे कल्कीने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे. मुलीच्या जन्मावेळी सोसलेल्या प्रचंड प्रसूतीवेदनेबद्दलही कल्कीने लिहिले आहे. ‘17 तास मी प्रसूती कळा सोसत होते. अखेर मी दमून गेले, गळून गेले.मी हार पत्करली. काहीही करा पण माझ्या बाळाला या जगात आणा, अशी आर्जव मी डॉक्टरांकडे केली. पण डॉक्टरांनी मला धीर दिला. तू इतक्या हिंमतीने वॉटरबर्थसाठी प्रयत्न केलेस.

 

आणखी थोडा धीर धर, असे डॉक्टर मला म्हणाले आणि तासाभरानंतर साफोचा जन्म झाला. प्रसूतीवेदना सहन करून नवा जीव जन्मास घालणा-या महिलांचा आदर करा, असे आवाहन केले होते. नवा जीव जन्मास घालताना महिलेला शारिरीक व मानसिकदृष्ट्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याऊपरही तिला सन्मान मिळत नाही, असे तिने लिहिले होते.

टॅग्स :कल्की कोचलीन