Join us

कल्कीनं 'सेक्रेड गेम्स२'च्या ऑडिशनचा सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 18:00 IST

'सेक्रेड गेम्स २'मध्ये कल्कि बात्या अबेलमनची भूमिका साकारणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिन हिने २००९ साली 'देव डी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि तिने गेल्या दहा वर्षांत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. रणवीर सिंगच्या 'गली बॉय' चित्रपटात शेवटची ती पहायला मिळाली होती. आता ती नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरिज सेक्रेड गेम्समधून रसिकांच्या भेटीला येणार आहे. कल्किने 'सेक्रेड गेम्स २'च्या ऑडिशनचा किस्सा सांगितला आहे.

कल्किने, ती 'सेक्रेड गेम्स'ची चाहती असल्याचं सांगतिलं होतं आणि एक दिवस तिला सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनसाठी ऑडिशनसाठी फोन आला. आपल्याला आवडत असलेल्या सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळत असल्याने तिला आनंद झाला आणि धक्कादेखील बसल्याचं कल्कीनं सांगितलं.

पण 'सेक्रेड गेम्स २'साठी ऑडिशन दिल्यानंतर पुढील तीन आठवडे तिला कोणाचाच फोन आला नाही. फोन न आल्यामुळे तिला ही संधी तिच्या हातून गेल्याचं वाटलं. त्यानंतर तिला एक फोन आला आणि आणखी एक ऑडिशन देण्याबाबत सांगण्यात आल्याचं तिने सांगितलं.

कल्की कोचलिन पुढे म्हणाली की, पण अशाप्रकारे पुन्हा ऑडिशन देण्यासाठी फोन आल्यामुळे माझ्या निवडीबाबत मला कोणताच अंदाज येत नव्हता. माझी निवड झाली की नाही? याबाबत काहीच स्पष्ट होत नव्हतं. त्यानंतर मी पुन्हा एकदा वेगळी साडी नेसून दुसरं ऑडिशन दिलं.

'सेक्रेड गेम्स २'मध्ये कल्कि बात्या अबेलमनची भूमिका साकारणार आहे. ती पंकज त्रिपाठी साकारत असलेल्या गुरुजी या व्यक्तिरेखेची भक्त दाखवण्यात आली आहे.

'सेक्रेड गेम्स २'मध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, सुरवीन चावला, जतिन सरना, ल्यूक केन्नीसह इतर अनेक कलाकार भूमिका साकारणार आहे. आज ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :कल्की कोचलीनसॅक्रेड गेम्स