Vikram : कमल हासन खुश्श! दिग्दर्शकाला भेट दिली लक्झरी कार,13 सहायक दिग्दर्शकांना दिलं खास गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 11:43 AM2022-06-08T11:43:24+5:302022-06-08T11:56:54+5:30
Vikram : विक्रम’च्या यशानं कमल हासन जाम खुश्श आहेत. हा आनंद त्यांनी कसा सेलिब्रेट केला तर, ‘विक्रम’च्या दिग्दर्शकांना कोट्यवधीच्या भेटवस्तू वाटून.
साऊथ मेगास्टार कमल हासन (Kamal Haasan) यांचा ‘विक्रम’ ( Vikram ) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. गेल्या 3 जूनला हा सिनेमा रिलीज झाला आणि पाचच दिवसांत या चित्रपटानं वर्ल्डवाईड 200 कोटींचा गल्ला जमवला. ‘विक्रम’च्या यशानं कमल हासन जाम खुश्श आहेत. हा आनंद त्यांनी कसा सेलिब्रेट केला तर, ‘विक्रम’च्या दिग्दर्शकांना कोट्यवधीच्या भेटवस्तू वाटून.
Thank you so much Aandavarey @ikamalhaasan 🙏🏻 ❤️❤️❤️ pic.twitter.com/h2qZjWKApm
— Lokesh Kanagaraj (@Dir_Lokesh) June 7, 2022
होय, काल 7 जूनला कमल हासन यांनी ‘विक्रम’चे दिग्दर्शक लोकेश कनगराज (Lokesh Kanagaraj ) यांना एक शानदार कार गिफ्ट दिली. ब्लॅक कलरची लेक्सस ही एक लक्झरी कार आहे. तिची किंमत 1 कोटींपासून सुरु होते.
https://t.co/zrQRWQN1Tapic.twitter.com/dSi5jTXkVc
— Ramesh Bala (@rameshlaus) June 7, 2022
‘विक्रम’च्या 13 सहाय्यक दिग्दर्शकांनाही कमल हासन यांनी Apache RTR 160 बाईक्स भेट दिल्यात. या एका बाईकची किंमत सुमारे 1 लाख रूपये आहे. काल कमल हासन यांनी ‘विक्रम’च्या दिग्दर्शकासह संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले होते. ‘विक्रम’ला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कमल हासन जाम खुश आहेत. हे आपल्या एकट्याचं यश नसून संपूर्ण टीमच्या मेहनतीचं फळ आहे, असं त्यांचं मत आहे. विशेषत: दिग्दर्शक लोकेश कनगराज आणि अन्य 13 सहाय्यक दिग्दर्शकांनी केलेलं काम पाहून कमल हासन यांनी त्यांना गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला व तो अमलाही आणला.
‘विक्रम’ या चित्रपटात कमल हासन शिवाय विजय सेतुपती, फहाद फासिल हे दोन साऊथ सुपरस्टार्स लीड रोलमध्ये आहेत. सुपरस्टार सूर्या याचाही कॅमिओ रोल आहे. पाच भाषांत रिलीज झालेल्या या चित्रपटाने पाचच दिवसांत वर्ल्डवाईड 200 कोटींची कमाई केली आहे. येत्या दिवसांत हा सिनेमा 500 कोटींची कमाई करेल, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.