Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत दिड वर्षांनी ट्विटरवर परतली आहे. ट्विटर येताच तिने पुन्हा आपल्या खास शैलीत इतरांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे आज शाहरुख खानचा पठाण (Pathaan) रिलीज झाला असून सगळीकडे सिनेमाचा बोलबाला आहे तर दुसरीकडे कंगनाने फिल्म इंडस्ट्रीवर टीका केली आहे. 'पठाण'चे नाव न घेता तिने बॉलिवुडवर निशाणा साधला आहे.
कंगनाने ट्विट करत लिहिले, 'फिल्म इंडस्ट्री मूर्ख आहे. जिथे आर्ट प्रोजेक्ट्सच्या यशाचे मोजमाप पैशातून केले जाते.' तिचं हे ट्वीट पठाणच्या रिलीजच्या दिवशीच आले आहे. कंगना म्हणते, 'यश मिळाल्यानंतर ते तुमच्या चेहऱ्यावर कमाईचे आकडे फेकतात, जसं काय कलेचे काही उद्देश्यच नसते. यातून त्यांची मानसिकता लक्षात येते.
ती पुढे म्हणाली, सिनेमा हा प्रमुख आर्थिक लाभासाठी बनत नाही आणि म्हणूनच कलाकारांची पूजा केली जाते. पूर्वी कला मंदिरांमध्ये होती आणि आता ती साहित्य/थिएटर पर्यंत येऊन पोहोचली आहे. भले ही कलाकार देशात कला आणि संस्कृती दूषित करण्यात व्यस्त असतील पण त्यांनी हे बेशरमीने नाही विवेकबुद्धीने केले पाहिजे.
कंगनाने नुकतेच इमर्जन्सी (Emergency) सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारली आहे.या सिनेमासाठी तिने तिची संपत्ती गहाण ठेवल्याचा धक्कादायक खुलासा नुकताच केला आहे.