Join us

 कंगनाच्या ‘मेंटल है क्या’ सिनेमाचे नाव बदलणार; हे असू शकते नवे टायटल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 3:34 PM

कंगना राणौत व राजकुमार राव यांचा  ‘मेंटल है क्या’ हा सिनेमा टायटलमुळे वादात सापडला आहे आणि  या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे नाव बदलण्याची तयारी आता सुरु झाली आहे.

ठळक मुद्देटायटलवरून सुरु असलेला वाद पाहता, सेन्सॉर बोर्डाकडून  सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला होता.

कंगना राणौतराजकुमार राव यांचा  ‘मेंटल है क्या’ हा सिनेमा टायटलमुळे वादात सापडला आहे आणि  या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे नाव बदलण्याची तयारी आता सुरु झाली आहे. होय,  इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन साइकेट्रिक सोसायटीने  ‘मेंटल है क्या’  या टायटलवर आणि चित्रपटाच्या पोस्टर्सवर तीव्र आक्षेप नोंदवत, सेन्सॉर बोर्ड, माहिती व प्रसारण मंत्रालय, पीएमओ अशा सगळ्यांना पत्र लिहिले होते. केवळ इतकेच नाही तर दीपिका पादुकोणच्या ‘द लिव्ह लाफ फाऊंडेशन’नेही या चित्रपटाच्या मेकर्सवर टीका करत, आपल्या जबाबदारीचे भान ठेवा, असे म्हटले होते.

ताज्या बातमीनुसार, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन साइकेट्रिक सोसायटीच्या आक्षेपाची सेन्सॉर बोर्डाने गंभीर दखल घेतली आहे. बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेलर रिलीजपूर्वी मेकर्सला या चित्रपटाचे नाव बदलावे लागणार आहे. ‘मेंटल है क्या’ या टायटलने चित्रपट प्रदर्शित होऊ शकणार नाही.

तर हे असेल नवे नाव‘मेंटल है क्या’चे टायटल बदललेच तर नवे टायटल काय असू शकते? याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. सूत्रांचे खरे मानाल तर, ‘मेंटल है क्या’ चे नाव बदलून ते ‘सेंटिमेंटल है क्या’ असे केले जाऊ शकते.

आत्तापर्यंत ‘मेंटल है क्या’चे तीन पोस्टर्स रिलीज झाले आहेत.पण ट्रेलर अद्यापही अडकला आहे. तशीच चित्रपटाची रिलीज डेटही लांबणीवर टाकण्यात आली आहे. आधी हा चित्रपट गत मे महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण आता ही तारीख २६ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. टायटलवरून सुरु असलेला वाद पाहता, सेन्सॉर बोर्डाकडून  सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला होता. याचमुळे चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. 

टॅग्स :मेंटल है क्याकंगना राणौतराजकुमार राव