Join us

माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या अरुणिमावरच्या बायोपिकमध्ये कृती किंवा कंगनाची लागणार वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 1:01 PM

माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय दिव्यांग महिला अरुणिमा सिन्हावरील बायोपिकची निर्मिती कमल जैन करणार आहेत.

ठळक मुद्दे कमल जैन आणि त्यांची टीम सध्या करतेय अरुणिमाच्या प्रवासावर रिसर्च अरुणिमा सिन्हा होत्या नॅशनल लेव्हलच्या वॉलीबॉल प्लेअर

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड पाहायला मिळतो आहे. माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय दिव्यांग महिला अरुणिमा सिन्हावर बायोपिक बनणार असल्याचे समजते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार निर्माते कमल जैन या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या सिनेमातील प्रमुख भूमिकेत कंगना रानौत किंवा कृती सेनॉनला विचारले जाऊ शकते अशी चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. कमल आणि त्यांची टीम सध्या अरुणिमाच्या प्रवासावर रिसर्च करत आहेत.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कमलने सांगितले की, 'अरुणिमा सिन्हावर बायोपिक बनवण्याबाबत अजून नक्की नाही. सध्या आम्ही सर्व गोष्टींविषयी चर्चा करत आहोत. सर्व काही फिक्स झाल्यानंतर आम्ही घोषणा करू.' विशेष म्हणजे, या विषयावर चित्रपट बनवण्याची इच्छा यापूर्वी हंसल मेहताने व्यक्त केली होती. त्यांनी अरुणिमा यांच्याकडून सिनेमा बनवण्याचे राइट्स घेतले होते. परंतू काही कारणांमुळे ही आयडिया ड्रॉप केली होती.30 वर्षांच्या अरुणिमा सिन्हा या नॅशनल लेव्हलच्या वॉलीबॉल प्लेअर होत्या. 2011 मध्ये त्यांना गुंडांनी ट्रेनच्या बाहेर फेकले होते. या अपघातात त्यांना त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागले. 21 मे 2013 रोजी त्या माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय दिव्यांग बनल्या. 2015 मध्ये त्यांना पद्मश्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.सूत्रांच्या माहितीनुसार, कंगना सध्या खूप व्यग्र आहे. त्यामुळे निर्माते कृती व कंगना यांच्यापैकी एकाची या चित्रपटासाठी निवड करणार आहेत. अरूणिमाचा बायोपिकचे चित्रीकरण साठ दिवसात आटोपणार आहे. कंगना सध्या मणिकर्णिका चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. या बायोपिकमध्ये कंगना की क्रिती या दोघींपैकी कोणाची वर्णी लागते हे पाहणे कमालीचे ठरेल. 

टॅग्स :कंगना राणौतक्रिती सनॉन