Join us

या दिवशी प्रदर्शित होणार कंगना राणौत आणि राजकुमार रावचा ‘मेंटल है क्या’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:16 PM

राजकुमारनने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे आणि त्याचसोबत हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे सांगितले आहे.

ठळक मुद्दे‘मेंटल है क्या’हा चित्रपट २१ जूनला प्रदर्शित होणार असून या चित्रपटांच्या सगळ्याच पोस्टरमध्ये कंगना आणि राजकुमार यांचा मजेशीर अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

‘मणिकर्णिका -द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटानंतर कंगना राणौत आता ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होणार होता. पण काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली. या चित्रपटाची प्ररदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता कंगना आणि राजकुमार यांच्या फॅन्सना लागली आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख खुद्द राजकुमारनेच त्याच्या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. 

राजकुमारनने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे आणि त्याचसोबत हा चित्रपट २१ जूनला प्रदर्शित होणार असल्याचे सगळ्यांना सांगितले आहे. या चित्रपटांच्या सगळ्याच पोस्टरमध्ये कंगना आणि राजकुमार यांचा मजेशीर अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

‘मेंटल है क्या’ची पटकथा लेखिका कनिका ढिल्लन हिने लिहिली असून या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी आहेत.

मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सिनेमात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची व्यक्तिरेखा कंगनाने साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे तिच्या या नव्या चित्रपटाची देखील तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. 

‘मेंटल है क्या’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख कंगनामुळे पुढे ढकलण्यात आली असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी मीडियात रंगली आहे. रिलीज डेट पुढे ढकलण्याची विनंती कंगनानेच केली असल्याचे म्हटले जात आहे. ‘मणिकर्णिका’ आणि ‘मेंटल है क्या’ या दोन चित्रपटांच्या रिलीजमध्ये काही महिन्यांचे अंतर असावे, असा कंगनाचा स्वत:चा तर्क होता. कंगनाच्या मते, ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट राणी लक्ष्मीबाईंच्या आयुष्यावर आधारित होता आणि ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. मार्चऐवजी आणखी काही महिन्यांनी हा चित्रपट रिलीज झाला तर त्याचा बऱ्यापैकी फायदा मिळेल असे तिचे मत होते.

टॅग्स :मेंटल है क्याकंगना राणौतराजकुमार राव